सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे दहावीची बोर्ड परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले
संघर्ष योद्धा रणजितदादा गायकवाड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र सदाशिवराव माने विद्यालय अकलूज असून या केंद्रात सुमारे 494 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्था पिण्याचे पाणी व्यवस्था याचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त व आनंदाने परीक्षेला सामोरे जावे याकरिता विद्यालयाने परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले याप्रसंगी संचालक उत्कर्ष शेटे आप्पासाहेब मगर एड रणजितसिंह माने देशमुख अमोल फुले दत्तात्रय घंटे टी वाय शिंदे सादिक झारेकरी झाकीर सय्यद या मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.







