पाणीव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
पाणीव प्रतिनिधी अभिजीत बाबर
पाणीव तालुका माळशिरस येथे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी काँग्रेस चे मा.अध्यक्ष प्रकाश बापू पाटील, पाणीव च्या मा पंचायत समिती सदस्य श्रीलेखा पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे सह सचिव करण भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सोलापूर जिल्हा प्रमुख अभिजीत बाबर, ऋतू गमे, अजय बाबर, विनोद बाबर,सिद्धू देशमुख, सोनू लावंड, दादा देवकर, दादा गमे, बापू देवकर प्रवीण बाबर, संतोष बाबर यांच्यासह शिवजयंती उत्साव समितीचे सर्व सदस्य शिवप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी अभिषेक पाटील यांच्या हस्ते शिवप्रतीमेचे पुजण करण्यात आले दिवसभरात पारंपरिक पद्धतीने विविध सामाजिक कार्यक्रम सादर करण्यात आले सायंकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य आशी मिरवणूक ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली तसेच कार्यक्रम स्थळी पाणीव गावातील योगेश अनिल बाबर. व माधुरी निलेश खताळ यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला शिवजन्मोउत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी, पदाधिकारी व गावातील शिवप्रेमी, ग्रामस्थ व तरूणांनी खूप परिश्रम घेतले व सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध पध्दतीने शांततेत पार पाडला.





