*श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तान ची धारातीर्थ गडकोट मोहीम*
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड


श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान धारातीर्थ गडकोट मोहीम पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी उभं केलेलं हे हिंदवी स्वराज्य गढदुर्गांच्या आधारेच निर्माण केलं या गडकोटांच्या आधारावर महाराजांनी अत्यंत अल्पसाधन सामग्री आणि थोडक्या सैन्यबळाच्या आधारे शेकडो रणसंग्रामात विजय मिळवले हे गडकोट जर नसते तर इतक्या अल्पावधीत हे हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकले नसते याच गडांवर हजारो नरवीरांनी आपल्या प्राणांची अहोती दिली आणि या गडदुर्गांना धारातीर्थ बनवल घडली धारातीर्थ म्हणून टिकले तीर्थक्षेत्र हे सत्य ध्यानात घेऊन उगवत्या पिढीच्या अंतकरणात देव देश आणि धर्म याविषयी अपार श्रद्धा उत्पन्न करण्याचा मोहीम हा एक प्रभावी मार्ग आहे आणि मागच्या 35 ते 40 वर्षांपासून गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी अशा मोहिमा करत आलेले आहे ज्या कोणाला देश टिकवायचा असेल तर त्याला भगवान छत्रपतींचे अंतकरण समजून घ्यावे लागेल आणि ते समजायचं असेल तर शिवछत्रपतींचे जिवंत साथीदार असणाऱ्या या गडदुर्गान वर श्रद्धायुक्त भावनांनी गेलं पाहिजे एका गडापासून दुसऱ्या गडापर्यंत पायी प्रवास करणे वाटेतल्या ऐतिहासिक स्थळां चे दर्शन घेणे शिवछत्रपतींच्या जीवनाच तत्त्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे गरजेचा आहे त्यासाठीच दर वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तान मार्फत धारातीर्थ गडकोट मोहीम आयोजित केली जाते आणी त्याला लाखों शिवप्रेमी प्रतीसाद देतात सध्या सुरू आसलेली गडकोट मोहीम हि नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे समाधीस्थळ (उमरठे) ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी श्रीमन रायगड(मार्गे श्री नरवीर श्री मुरारबाजी देशपांडे समाधीस्थळ अशी आयोजित करण्यात आलेली आहे







