एलआयसीचे चे विमा प्रतिनिधी सागर उरवणे यांना सलग तिसऱ्या वर्षी विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय एमडीआरटी पुरस्कार जाहीर
अकलूज (प्रतिनिधी )एलआयसीचे चे विमा प्रतिनिधी सागर उरवणे यांना सलग तिसऱ्या वर्षी विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय एमडीआरटी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तसेच अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमा परिषदेत सहभागी होणार असल्याची एमडीआरटी पुरस्कार विजेते सागर उरवणे यांची माहिती दिली.सदाशिवनगर येथील सागर उरवणे हे गेल्या 21 वर्षापासून एलआयसी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.
त्यांनी गेल्या तीन वर्षात सदाशिवनगर आणि पुरंदवडे या गावाला बिमा ग्राम पुरस्कार मिळवून दिलेला आहेगेल्या 21 वर्षाच्या कालावधीत ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देत असताना जवळपास 2000 लोकांना विम्याचे छत्र त्यांनी दिलेले आहे.
या पुरस्काराबद्दल युवा नेते अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.







