*माढा विधानसभा निवडणुकीत अकलूजचे शिवतेजसिंह मोहिते पाटील तुतारी फुंकणार* *श्रीपूर**बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार*
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक समीकरण बदलून पुन्हा एकदा जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी अकलूज चे शिव रत्न बंगल्यावर आली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून अकलूजला कार्यकर्ते नेते यांची लगबग वाढली आहे यावेळी माढा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अकलूजचे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या गळ्यात विधानसभेची माळ गळ्यात पडणार हे चित्र स्पष्ट झाले आहे
ओन्ली शिवबाबा हा नारा संपूर्ण माढा विधानसभा मतदारसंघात गर्जत आहे गेली सहा महिने शिवबाबा व त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांची बाजू ऐकण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी ते व त्यांचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करत आहेत त्यामुळे या मतदारसंघात गाव वस्त्या वाड्यावर शहरात फक्त शिवबाबा हेच नाव चर्चेत राहिलेले आहे काना मनात ध्यानात व पुन्हा पुन्हा शिवबाबा हेच नाव मतदारांत कोरले आहे
अकलूजचे सामाजिक राजकीय सांस्कृतिक वैचारिक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी विचारांची जबाबदारी संपूर्णपणे पेलण्याची क्षमता शिवबाबा यांनी त्यांचे चुलते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील जयसिंह ऊर्फ बाळदादा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तालमीत ते चांगलेच तयार झाले आहेत अतिशय विनम्र स्वभाव मनमिळाऊ व थोरामोठ्यांचा आदर करण्याची त्यांची वाखाणण्याजोगी पध्दत यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय व लोकमान्य झाले आहेत गोरगरीब जनतेला उपेक्षित घटकांना सदैव मदतीला धावून जाणे ही त्यांनी आपल्या मोहिते पाटील घराण्याची परंपरा सांभाळली आहे कार्यकर्त्यांची विस्कटलेली घडी बसवण्याचा त्यांचा हातखंडा आहे उद्योग महर्षी कै उदयसिंह मोहिते पाटील यांचे ते सुपुत्र आहेत
अतिशय सुसंस्कृत व्यक्तीमत्व सोज्वळ स्वभाव यामुळे ते राजकारणात प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात ते दमदार कामगिरी पार पाडतील याची झलक ते त्यांच्या कार्यपध्दती ने सतत दाखवून देतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून त्यांच्या लोकप्रियतेची दखल घेतली आहे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या मर्जीतील ते युवा कार्यकर्ते आहेत
माढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे त्यामुळे माढा विधानसभा निवडणुकीत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह प्रेरणा नवचैतन्य संचारले आहे आनंदाचे भरते आले आहे ते आमदार होणार ही खुणगाठ मनात बांधून आता पासूनच सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत मोहिते पाटील यांचे वर्चस्व व नेतृत्व अबाधितच रहाणार हे निश्चित माढा विधानसभा निवडणुकीत विजयाची तुतारी महाराष्ट्र विधानसभेत शिवबाबा फुंकणार हे जवळपास नक्की







