*माळशिरस राखीव मतदारसंघातून भुमी पुत्र लालासाहेब अडगळे बंडखोरी करणार?*
प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. प्रत्येक जिल्ह्यात विविध तालुक्यात अनेकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून ज्या त्या पक्षांचे श्रेष्ठींकडे साकडे घालण्यात येत आहे. परंतु माळशिरस तालुक्यात विविध चर्चा उधाण आलेले पहायला मिळत आहे. नुकताच 2024 विधानसभा कार्यक्रम जाहीर झाला 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता सुरु झाली आहे. 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, 30 तारखेला अर्जाची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. तर 20 नोव्हेंबर ला संपूर्ण राज्यात एकाच टप्यात निवडणूक होत असून 23 नोव्हेंबर ला मतमोजणी होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हा अनुसूचित जाती साठी राखीव असून यापूर्वी स्वर्गीय हनुमंत राव डोळस यांनी दोन वेळा या मतदार संघातून प्रतिनिधित्व केले आहे. तर 2019ला भाजपा चे आमदार राम सातपुते हे निवडून आले.2024च्या निवडणूक साठी वेगवेगळ्या पक्षाकडून सध्या अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून उत्तमराव जानकर, इंजिनियर राजेश गुजर भाजपा कडून आमदार राम सातपुते, डॉ. अप्पासाहेब देशमुख, भूषण कांबळे, सूरज मस्के, अतुल सरतापे, आदी इच्छुक आहेत. सर्वांनीच आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मतदारसंघात नेते मंडळी, तसेच गाव भेट दौरा करून नागरिकांची मते आजमावली जात आहेत.
परंतु माळशिरस तालुक्यातील आणखी एक भुमी पुत्र म्हणून ज्यांचे नांव चर्चेत आहे . असे अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे हे कोणत्या ना कोणत्या विषयाने माळशिरस तालुक्यात नेहमी चर्चेत असतात. मोहिते पाटील घराण्यातील एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते असणारे लालासाहेब अडगळे यांनी मात्र यावेळी माळशिरस विधानसभेत बंडखोरी करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लालासाहेब अडगळे यांनी गेली तीस वर्षे सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, शैक्षणिक कला, क्रीडा क्षेत्रात काम केलेले आहे. अनेक निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. माळशिरस तालुक्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे जातींचे दाखले काढणाऱ्यांना त्यांनी रोखण्यासाठी विविध आंदोलने निदर्शने करुन माळशिरस तालुक्यातील खोटे जातींचे दाखले काढणाऱ्यांना धडकी भरविण्याचे काम केले आहे. माळशिरस तालुक्यात विविध सामाजिक कार्ये त्यांनी केलेली आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना उमेदवारी देणार म्हणून खुद्द मोहिते पाटील यांनी सांगितले असल्यामुळे मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. माळशिरस तालुक्यात अनेकांनी वेगवेगळ्या पध्दतीने उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाकडे मागण्या करलेल्या आहेत. परंतु लालासाहेब अडगळे हे मात्र कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी मागण्यांसाठी गेलेले नाहीत. म्हणून माळशिरस तालुक्यात विधानसभा निवडणुकीत लालासाहेब अडगळे यांची बंडखोरी कायम असल्याचे दिसून येते आहे. गेली आठ दिवस झाले लालासाहेब अडगळे हे कुठेच दिसलेले नाहीत असे अकलूज मध्ये चर्चा चालू आहे. लालासाहेब अडगळे नक्की कोणाच्या संपर्कात आहेत. कुठे आहेत. नेमकी त्यांची भुमिका काय आहे. या संदर्भात कोणालाही काही सांगता येत नाही म्हणून गावोगावी एकच चर्चा अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे बंडखोरी करणार? लवकरच याबाबत स्पष्टता लक्षात येईल तुर्तास तरी लालासाहेब अडगळे यांची बंडखोरी कायम आहे असे दिसत आहे.







