माळशिरस विधानसभा मतदारसंघातून इंजि. राजेश गुजर राष्ट्रवादी कडून प्रबळ दावेदार
अकलूज (प्रतिनिधी) – माळशिरस विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनेक जण इच्छुक आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून मळोली गावचे इंजी. राजेश भगवानराव गुजर यांच्या नावाची चर्चा सुरू असून, नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखतीमध्ये त्यांनी दिलेल्या मुलाखतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजेश गुजर यांची माळशिरस तालुक्यात ओळख आहे. त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.अनेकांच्या सुख दुःखात हिरीरीने सहभागी झाले आहेत.शालेय विदयार्थ्यांना वह्या वाटप देखील मोठया प्रमाणावर केले आहे.
माळशिरस विधानसभा मतदार संघात त्यांचा चांगला जनसंपर्क देखील आहे.ते यापूर्वी विदयुत महावितरण मध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते.ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.आपल्या नोकरी च्या कार्यकाळात देखील त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यापासून ते सतत चर्चेत राहिले आहेत.सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी साठी ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाला संधी देणार हे काही दिवसातच कळेल.







