*शेतकरी हा भारताचा आत्मा !! जीएसटी हा तर भारताच्या आत्म्यावरील कर !!.**खासदार धैर्यशील मोहिते पाटील.*
शेतकरी हा भारताचा आत्मा आहे, असे नेहमी म्हटले जाते. परंतु सरकार जीएसटीच्या माध्यमातून भारताच्या आत्म्यावर कर आकारत आहे.बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, यंत्रसामुग्री आदींच्या खरेदीसाठी जीएसटी अंतर्गत कर आकारला जात आहे. परंतु, बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, यंत्रसामुग्री आदींवर भरलेल्या जीएसटीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणताही नोंदणी क्रमांक दिला जात नाही. परंतु, व्यावसायिक, उद्योजक इत्यादि धनाढ्य घटकांना केवळ जीएसटी नोंदणीची सुविधाच नव्हे, तर त्यांचा उत्पादन खर्चावर भरलेल्या कराच्या लाभावर सेट-ऑफ, सूट आदींचा दावा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अगदी पगारदार व्यक्तीलाही शैक्षणिक फीसारख्या काही गोष्टींचा लाभ करांमध्ये मिळतो. परंतु, उत्पादन खर्चावर भरलेल्या कराचा लाभ घेण्यापासून शेतकाऱ्यास वंचित ठेवण्यात आले आहे; ही या कृषिप्रधान देशाची शोकांतिका आहे.कृषी क्षेत्राला अनेकवेळा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो; शेतीचे उत्पन्न अनिश्चित असते; शेतकरी हा हालाखीत त्याची शेती करीत असतो. स्वतः कष्ट उपोसतो, पण, देशाची भूक भागवतो. तरी देखील, जीएसटीमुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे सरकार दुर्लक्ष करत असून, शेतकऱ्यांचा नफा १८ टक्क्यांनी हिरावून घेतला जात आहे. हा शेतकऱ्यावरील सुलतानी जुलूम आहे.त्यामुळे, लोकप्रतिनिधी म्हणून माझी मागणी आहे की, जीएसटीच्या जाचक विळख्यातून शेतकऱ्यांची सुटका होईल,अशी यंत्रणा सरकारने निर्माण करावी. बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, यंत्रसामुग्री आदींच्या खरेदीदरम्यान भरलेल्याजीएसटीच्या रकमेवर सेटऑफ, सवलत किंवा परताव्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल, अशी यंत्रणा निर्माण झाली तर… शेतकऱ्यांच्या उत्पन्नात १८ टक्क्यांनी वाढ होईल. विडंबना अशी आहे की शेतकऱ्याने गहू, ज्वारी सारखे स्वतः पिकवलेला शेतमाल आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, तर बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, यंत्रसामुग्री इत्यादींवरही जीएसटी भरावा लागतो…त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामावर व भाकरीवर देखील जीएसटीच्या माध्यमातून कर आकारला जात आहे. त्यामुळे, लाडकी बहिण योजनेचा १,५००/- रुपयांचा आनंद घेण्यापूर्वी; पत्नींनी आपल्या पतीला विचारावे, मुलींनी वडिलांना विचारावे आणि आईने आपल्या मुलांना विचारले पाहिजे की, ते सरकारला किती जीएसटी देत आहेत.बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, यंत्रसामुग्री आदींची खरेदी; जोपर्यंत सरकार बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, यंत्रसामुग्री इत्यादी उत्पादन खर्चावर भरलेल्या जीएसटी रकमेवर सेट-ऑफ, सूट किंवा परताव्याची यंत्रणा सरकार तयार करत नाही; तोपर्यंत शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जीएसटीमुक्त करावा; अशी माझी सरकारकडे मागणी आहे.माझा विचार असा आहे की, कोणत्याही परिस्थितीत अप्रत्यक्ष पद्धतीने देखील या देशात शेतकऱ्यावर कर आकारला जाऊ नये. भारताच्या आत्म्यावर, शेतकऱ्यांच्या घामावर, शेतकऱ्यांच्या भाकरीवर व देशाची भूक भागविणाऱ्या शेतीतील घटकांवर कर लावता कामा नये.
*खासदार धैर्यशील मोहिते पाटील* *माढा लोकसभा मतदारसंघ.*







