माळशिरस विधानसभा मतदारसंघात आश्वासक चेहरा सूरज मस्के
अकलूज (प्रतिनिधी )विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली आहे.माळशिरस विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. अद्याप निवडणुकीला काही महिने अवधी आहे.
परंतु आतापासूनच इच्छुकांनी मतदारसंघात फेरफटका सुरु केला आहे. पक्ष श्रेष्टी, नातेवाईक, मित्र मंडळी, गावभेट दौरे सुरु झाले आहेत.तसेच सुख दुःखात देखील सामील होत आहेत.माळशिरस तालुक्यात दुरंगी लढत होण्याची शक्यता असून, अनेक अपक्ष उमेदवार देखील असणार आहेत.प्रमुख लढत ही प्रामुख्याने भाजपा आणि राष्ट्रवादी अशीच होणार आहे. सध्या राष्ट्रवादी कडून उत्तमराव जानकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.तर भाजपा चे विद्यमान आमदार राम सातपुते यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने संभ्रम वाढला आहे.
त्यामुळे भाजपा कडून उमेदवारी मिळविण्यासाठी सुरज मस्के, अतुल सरतापे, भूषण कांबळे हे प्रयत्नशील आहेत. तिघांनीही आपापल्या परीने मोर्चे बांधणी सुरु केली आहे.परंतु सध्यातरी सुरज मस्के यांनी मात्र आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. सुरज मस्के यांनी गेल्या काही दिवसापासून मतदारसंघातील नागरिकांच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना प्रतिसाद देखील मोठया प्रमाणावर मिळत असल्याचे दिसून येत आहे
.त्यांनी गेल्या दहा वर्षापासून भाजपा चे काम प्रामाणिकपणे केले आहे. मिळेल ती जबाबदारी पार पाडली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वं योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत.
सध्या संग्रामनगर, अकलूज येथील रहिवाशी असलेले भाजपा चे युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस व पुण्यश्ल्योक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर चे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुरज मस्के हे भाजपा कडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ते गेल्या दहा वर्षापासून पक्षात सक्रिय आहेत.२०१९-२०२२ या कालावधीत त्यांनी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जिल्हा अध्यक्ष (सोलापूर)म्हणून देखील कामकाज पाहिले आहे.या अभियानाअंतर्गत ११ तालुक्यामध्ये सक्रिय संघटन केले आहे.त्याचप्रमाणे 2020-21मध्ये कोरोना काळात देखील सामाजिक कार्य केले आहे. अनेक रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळवून देण्यापासून ते त्यांना डबे पोहोच करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.एव्हढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या व त्यांचा लाभ मिळवून दिला.२०२२-२०२४या कालावधीत भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस जबाबदारी देखील पार पाडली.भाजप युवा मोर्चा माळशिरस विधानसभा प्रमुख म्हणून देखील कामकाज पाहिलेयाशिवाय शक्तिकेंद्र प्रमुख संग्रामनगर येथे काम केले.बूथ सशक्तीकरण अभियान यशस्वीरीत्या पार पडले. सेवा पंधरवडा,मन कि बात,परीक्षा पे चर्चा हर घर तिरंगा,नमो नवमतदाता संमेलन,नमो चषक २०२४ आदी उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई, चांदोली विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.अ. भा. विद्यार्थी परिषद च्या माध्यमातून देखील त्यांनी विदयार्थ्यांच्या प्रश्नासाठी काम केले आहे
.एव्हढेच नव्हे तर त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक, विधायक उपक्रम राबविले आहेत. त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असल्यामुळे त्यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे.दरम्यान त्यांनी भाजपा च्या वरिष्ठ नेत्यांबरोबर संपर्क साधला असून उमेदवारी ची इच्छा व्यक्त केली आहे.माळशिरस तालुक्यातील नागरिकांमधून सध्या माळशिरस चा आमदार हा भूमिपुत्र हवा. असा सुर उमटत आहे.
त्यामुळे सध्यातरी माळशिरस मधून सुरज मस्के हेच भाजपा चे उमेदवार असतील. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.भविष्यात देखील आपण शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.त्यांनी गेल्या काही दिवसापासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून, ते अहोरात्र मतदारसंघात फिरत आहेत. परिसरातील नागरिकांच्या सुख दुःखात सामील होत आहेत. वेळात वेळ काढून नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न देखील मार्गी लावत आहेत.
दिवसेंदिवस त्यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे भाजपा कडून निश्चितपणे आपल्याला संधी मिळेल. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.







