माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपा कडून सुरज मस्के प्रबळ दावेदार
अकलूज (प्रतिनिधी )विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यात होत असून, माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक इच्छुकांनी प्रचार दौरे सुरु केले आहेत.मतदारसंघातील विविध पक्षातील नेतेमंडळी, नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन नागरिकांची मते जाणून घेत आहेत.
माळशिरस विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती जमाती साठी राखीव असून. राखीव झाल्यानंतर स्वर्गीय हनुमंत डोळस हे दोन वेळा आमदार झाले.तर 2019मध्ये भाजपा उमेदवार राम सातपुते हे आमदार झाले.
2024च्या निवडणुकीत मात्र आता चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.अशातच आता आम्हाला परका उमेदवार नको, स्थानिक भूमिपुत्र उमेदवार हवा. असा सुरु मतदार संघातील नागरिकांमधून उमटत आहे.
माळशिरस विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देतो. यावर बरेचसे चित्र अवलंबून आहे.राष्ट्रवादी काँग्रेस कडून सध्या उत्तमराव जानकर यांचे नाव आघाडीवर आहे.तर भाजपा कडून देखील अनेकजण इच्छुक आहेत.
सध्या संग्रामनगर, अकलूज येथील भाजपा चे युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस व पुण्यश्ल्योक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर चे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुरज मस्के हे भाजपा कडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
ते गेल्या दहा वर्षापासून पक्षात सक्रिय आहेत.२०१९-२०२२ या कालावधीत त्यांनी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जिल्हा अध्यक्ष (सोलापूर)म्हणून देखील कामकाज पाहिले आहे.या अभियानाअंतर्गत ११ तालुक्यामध्ये सक्रिय संघटन केले आहे.
त्याचप्रमाणे 2020-21मध्ये कोरोना काळात देखील सामाजिक कार्य केले आहे. अनेक रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळवून देण्यापासून ते त्यांना डबे पोहोच करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.
एव्हढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या व त्यांचा लाभ मिळवून दिला.२०२२-२०२४या कालावधीत भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस जबाबदारी देखील पार पाडली.भाजप युवा मोर्चा माळशिरस विधानसभा प्रमुख म्हणून देखील कामकाज पाहिले याशिवाय शक्तिकेंद्र प्रमुख संग्रामनगर येथे काम केले.बूथ सशक्तीकरण अभियान यशस्वीरीत्या पार पडले. सेवा पंधरवडा,मन कि बात,परीक्षा पे चर्चा हर घर तिरंगा,नमो नवमतदाता संमेलन,नमो चषक २०२४ आदी उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई, चांदोली विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.अ. भा. विद्यार्थी परिषद च्या माध्यमातून देखील त्यांनी विदयार्थ्यांच्या प्रश्नासाठी काम केले आहे.
सुरज मस्के हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असून त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक, विधायक उपक्रम राबविले आहेत.मतदार संघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.भविष्यात देखील अनेक सामाजिक, विधायक उपक्रम राबवायचे असून पक्षाने संधी दिल्यास आपण त्याचे सोने करू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.







