आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या माळशिरस तालुका प्रमुख पदी रणजितदादा गायकवाड यांची निवड संघर्ष योध्दा/माळशिरस प्रतिनिधी
विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात सतत आघाडीवर असणारे व्यक्तिमत्व रणजितदादा गायकवाड यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या वतीने त्यांच्या कामाचा गौरव म्हणून संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड केली आहे
श्री शिवशंभू चारिटेबल स्ट्रस्ट. शिवार फाऊंडेशन.मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष मार्फत रक्तदान शिबीर आयोजित करणे व्रुक्षारोपण कार्यक्रम करणे गरिब गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करणे गरिब पेशंटना वैद्यकीय मदत मिळवून देणे आषाढी वारी मधील वारकऱ्यांना विविध सेवा पुरवणे गरजू पेशंटना मोफत रक्त उपलब्ध करून देणे या व अशा अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन उत्साहात तो उपक्रम राबविण्यात सतत आघाडीवर राहून समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून काम करणं हा त्यांचा आवडता छंद झाला आहे
त्यांच्या याच कामाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष श्री किसनराव पाटील यांनी त्यांची संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड केली आहे. रणजितदादा गायकवाड यांच्या निवडीमुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या






