• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी इथून पुढे सर्व जातीपातीच्या सर्वपक्षीय आमदारांच्या घरावर ‘मतदान बहिष्कार मोर्चा’काढणार -योगेश केदार अकलूज येथे मराठा वनवास यात्रा बैठकीचे आयोजन.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 22, 2023
in महाराष्ट्र
0
मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी इथून पुढे सर्व जातीपातीच्या सर्वपक्षीय आमदारांच्या घरावर ‘मतदान बहिष्कार मोर्चा’काढणार -योगेश केदार                                                          अकलूज येथे मराठा वनवास यात्रा बैठकीचे आयोजन.
0
SHARES
300
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी इथून पुढे सर्व जातीपातीच्या सर्वपक्षीय आमदारांच्या घरावर ‘मतदान बहिष्कार मोर्चा’काढणार -योगेश केदार अकलूज येथे मराठा वनवास यात्रा बैठकीचे आयोजन.

अकलूज (प्रतिनिधी )मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे. या मागणीसाठी 6मे रोजी तुळजापूर येथून तब्बल 500किलोमीटर भर उन्हात 42डिग्री तापमान असताना मराठा वनवास यात्रा सुरु केली. त्यानंतर 6जून रोजी ती मुंबई ला पोहचली. त्यानंतर मुंबई येथील आझाद मैदान येथे भर पावसात, चिखलात तीन महिने उपोषण केले.यावेळी उपोषणकर्त्या बांधवावर खोटे गुन्हे देखील दाखल केले. अनेक बिनबुडाचे आरोप केले. परंतु न्यायालयाने मात्र हे आरोप फेटाळून निर्दोष मुक्त केले.तरीही झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आली नाही.

आता पुढे काय? इथून पुढे सर्व जातीपातीच्या सर्वपक्षीय आमदारांच्या घरावर ‘मतदान बहिष्कार मोर्चा’!काढायचा असे मत मराठा वनवास यात्रेचे आयोजक योगेश (दादा )केदार यांनी व्यक्त केले.21ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7वाजता मराठा वनवास यात्रेच्या अनुषंगाने जुडलेल्या बांधवांच्या सोबत चर्चा केली. लवकरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांच्या घरावर मतदान बहिष्कार मोर्चा काढण्यासंदर्भात प्राथमिक स्तरावर विचारांचे आदान प्रदान केले. अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात अचानक बैठकीचे आयोजन बांधवांनी केले.तब्बल अडीच तास चर्चा चालली.

मराठा वनवास यात्रेचे आयोजक योगेश केदार पुढे बोलताना म्हणाले की,येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने जागृत मतदार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आजपर्यंत सर्वपक्षीय राजकारण्यांनी मराठा समाजाला गृहीत धरले असल्याचे दिसून येते. मराठा गटतट बघतो, सर्वच राजकीय पक्षात तो विखुरला गेला आहे. त्यामुळे संख्येने सर्वात मोठा असला तरी मराठा समाजाचे राजकीय दृष्ट्या उपद्रवमूल्य नगण्य मानले जाते. म्हणून तर कोणताही राजकारणी किंवा राजकीय पक्ष मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण मागणी बाबत गंभीर दिसत नाही. आपल्या मागणी बाबत मोजकेच आमदार आता हळू हळू बोलू लागले आहेत. आपल्याला हा वेग वाढवावा लागेल. तो वाढवायचा असेल तर निवडणुकीत बहिष्कार टाकावा लागेल.

17 टक्के लिंगायत समाजाने कर्नाटक मध्ये भाजप चे सरकार घालवले मग आपण तर 32 टक्के पेक्षा जास्त आहोत. आपण महाराष्ट्रातले सगळे पक्ष दाण्याला लावू शकतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे अभी नहीं तो कभी नहीं या न्यायाने कामाला लागू. जेंव्हा सगळ्या आमदारांच्या घरावर मराठे निवडणुकीच्या अनुषंगाने मतांचा बहिष्कार टाकतील तेंव्हा सगळ्या पक्षांना गुडघ्यावर यावे लागेल. आपण तसे नियोजन करू. आजपर्यंत अनेकांना आपण नेता बनवले, नेत्यांच्या अनेक पिढ्या सांभाळल्या. पण यावेळी एकवेळ जातीसाठी मतदान करायचे. हा विचार महाराष्ट्रात पेरला पाहिजे.

आपण समाज म्हणून राज्यातील आमदारांना 17 जुलै रोजी आवाहन केले होते. जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षण मागणी लावून धरावी अशी साधी अपेक्षा व्यक्त केली होती. पण तीन आमदार सोडले तर कुणीही बाजू घेतली नाही. मग आपण ज्या आमदारांना मत दिले त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आपला नक्कीच आहे. आपण तो ठासून विचारला पाहिजे. मतदानावेळी सर्व आमदार आपल्या दारावर मत मागायला येतात. आता आपण आमदारांना त्यांच्या दारावर जाऊन ओबीसी आरक्षण बाबत जाब विचारू. त्यांच्याकडून लेखी पत्र घेऊ. ते पत्र समाजाच्या खर्चाने संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय तसेच मंदिरांवर लावू. अन् जो आमदार विरोध करेल त्यांच्या विरोधात संपूर्ण मतदार संघात विरोधाची पोस्टर लावू. भिंतीवर बहिष्कार टाकला असल्याचे ठळक अक्षरात लिहू. मग बघा कसे गुडघ्यावर येतात. अश्या अनेक संकल्पनांवर आज एकमत झाले.

पहिली बहिष्कार सभा उमरगा येथे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या घरावर होईल. त्यांनतर आणखी पाच मतदार संघ निश्चित झाले आहेत. स्थानिक बांधव यांचे बरोबर चर्चा करून सर्वांना सोबत घेऊन पुढचे कार्यक्रम होतील.

या बैठकीसाठी विनोद थिटे,महादेव काळे, नवनाथ भाकरे, उमेश भाकरे, अभिजीत बाबर, पत्रकार गणेश जाधव, अजिंक्य सावंत, अमोल पिंपळे, अमर जाधव, पवनराजे घोगरे पाटील, रणजित चव्हाण, सचिन चव्हाण,व इतर बांधव उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
जनसेवा रिक्षा स्टॉप नाम फलक अनावरण सोहळा संपन्न

जनसेवा रिक्षा स्टॉप नाम फलक अनावरण सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In