शिलरत्न व संविधान मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्च टाळून अंबाबाई रोड -2येथील अंगणवाडी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
अकलूज (प्रतिनिधी )शिलरत्न अजित मोरे व संविधान कबीर मोरे यांच्या 17ऑगस्ट वाढदिवसाचे औचित्य साधून इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मोरे परिवार मित्रमंडळ यांच्या वतीने अकलूज येथील माळीनगर बिट -2अंतर्गत येणाऱ्या अंबाबाई रोड -2येथील अंगणवाडी मधील 20विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून एक आगळा -वेगळा वाढदिवस साजरा केला.व विद्यार्थ्यांची गरज ओळखुन गणवेश वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी अंगणवाडी सेविका सौ. संध्या गणेश जाधव, मदतनीस श्रीमती कमल लोखंडे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.










