*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माळशिरस आयोजित भव्य 555 फूट तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न*
७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माळशिरस शाखेच्या वतीने माळशिरस येथे भव्य ५५५ फुटी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेचे उद्घाटन गोपाळराव देव प्रश्नाला येथे करून ही पदयात्रा अहिल्यादेवी होळकर चौक- बस स्टैंड – मारुती मंदिर – नगर परिषद – छत्रपती शिवाजी महाराज चौक उमाजी नाईक चौक- अकलूज रोड ते गोपाळराव देव प्रश्नाला काढण्यात आली. या पदयात्रेला उद्घाटक म्हणून माळशिरस पोलीस निरीक्षक टाकने साहेब,उपनिरीक्षक दत्तराव मोहिते साहेब निवृत्त मुख्याध्यापक मुकुंद कुलकर्णी सर, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य सुरज मस्के ,भाजपा किसान आघाडी जिल्हा प्रमुख बाळासाहेब सरगर,समाजसेवक अनांद शेंडगे सर,अभाविप तर्फे जिल्हा संयोजक वरद बाबर , जिल्हा. सहसंयोजक हितेश पुंज व जिल्हा. सहसंयोजक दिग्विजय माने देशमुख अभाविप शहर अध्यक्ष दिनेश भोसले सर,प्रशालेचे मुख्याध्यापक कांबळे सर, उप मुख्याध्यापक शिंदे सर,बाळासाहेब राऊत ,निलेश देशपांडे सर, सुरेश वाघमोडे, काटकर सर, करुणा धुमाळ मॅडम, कुलकर्णी मॅडम व अभाविप माळशिरस चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते, या पदयात्रेत विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. माळशिरस शहरातील नागरिकांनी पदयात्रेवर शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.










