आमदार राम सातपुते यांच्या सौभाग्यवती सौ . संस्कृती सातपुते यांची सुनिल बनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
.अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या सौभाग्यवती सौ. संस्कृती ताई सातपुते यांनी भाजपा माळशिरस तालुका ओबीसी अध्यक्ष व सोशल मीडिया प्रमुख आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सुनिल बनकर यांच्या दहिगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये फेरफटका मारून शेतीची पाहणी केली. सुनिल बनकर यांचे काम व निष्ठा यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी सुनिल बनकर यांची आई अंजना बनकर व पत्नी अपर्णा बनकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कुटुंबासोबत जेवणाचा आस्वाद घेतला त्यांच्या यथोचित मानसन्मान व आदरातिथ्याने भारावून गेले.







