*जात चोर जीवन व ज्योती जानकर यांना पुन्हा प्रतिक्षाच करावी लागली – लालासाहेब अडगळे*
अकलूज प्रतिनिधी – मा. मुंबई उच्च न्यायालयात उत्तम जानकर यांच्या बनावट खोट्या दाखल्या संदर्भात याचिका दाखल होताच. जीवन व ज्योती जानकर यांच्या दाखल्यावर सोलापूर जिल्हा जातपडताळणी समितीने तडकाफडकी सुनावणी घेण्याचे ठरवले होते. परंतु सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीला अखेर या मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिकेच्या निर्णयाची वाट पहावी लागणारच असा सुनावणी वेळी युक्तीवाद झाला.
सोलापूर जातपडताळणी समिती जानकर कुटुंबाची पाठराखण करण्याचा वारंवार प्रयत्नात असते पण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही वेळ पडलीच तर सोलापूर जिल्हा जातपडताळणी समितीच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी ठेवलेली आहे. म्हणून आणि नाईलाजाने सोलापूर जात पडताळणी समितीने आमच्या युक्तीवादमुळे शेवटी जीवन व ज्योती जानकर यांना थांबवले.
जीवन व ज्योती जानकर यांनी कितीही अधिकारी हाताशी धरून लक्ष्मी दर्शन दिले तरी ही काहीही फरक पडणार नाही अनुसूचित जाती व जमातीच्या न्याय हक्कासाठी आम्ही स्वस्थ बसणार नाही. दि ८ सप्टेंबर २०२३ रोजी मा.मुबंई उच्च न्यायालयात उत्तम जानकर यांच्या बनावट खोट्या दाखल्यावर सुनावणी होणार आहे. म्हणून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत जीवन व ज्योती जानकर यांना थांबावेच लागेल आणि सोलापूर जिल्हा जातपडताळणी समितीने या प्रकरणात घाई करु नये. असे मत लालासाहेब अडगळे यांनी व्यक्त केले.








