वसंतदास माणिकदास शहा यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी )इंदापूर तालुक्यातील बावडा येथील मूळचे रहिवाशी असलेले व सध्या संग्रामनगर (अकलूज )येथील रहिवाशी वसंतदास माणिकदास शहा (वय 78वर्षे )यांचे 6ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.ते बावडा येथील यशवंत सोसायटी चे माजी संचालक होते. तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. तर अकलूज येथील व्यापारी शहा एंटरप्रायजेस चे प्रॉप्रायटर कमलेश व निलेश शहा यांचे ते वडील होते.त्यांच्या पाठीमागे दोन मुले, एक मुलगी, जावई, नात असा परिवार आहे.ते अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचेवर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे संध्याकाळी 4-30वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.






