सुशीला रामचंद्र कुंभार “यांचे अल्पशा आजाराने निधन
अकलूज (प्रतिनिधी)निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथील सुशीला रामचंद्र कुंभार यांचे निमसाखर येथे अल्पशा आजाराने शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वाजता निधन झाले मृत्यू समय त्या 77 वर्षांचे होत्या.त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा,सून, दोन पुतणे,12नातवंडे असा परिवार असून सुशीला कुंभार ह्या कै. स्वातंत्र सैनिक रामचंद्र सावळा कुंभार यांच्या पत्नी व सोलापूर जिल्हा असंघटित कामगार संघटनेच्या ज्योतीताई कुंभार यांच्या मातोश्री होत.निमसाखर येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा (सावडण्याचा) विधी सोमवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता निमसाखर येथे होणार आहे. त्यांच्या स्वभाव, मनमिळाऊ आणि प्रेमळ होता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






