*आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ६० कोटी रूपये मंजूर*
अकलूज (प्रतिनिधी ) पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्प जुलै २०२३ मध्ये माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देंवद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून ६० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.तालुक्यातील २९ रस्त्यांसाठी एक ३०.८० कोटी रूपये मंजूर झाले आहेत यात राज्यमार्गासाठी ५ कोटी रूपये, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गासाठी २५.८० कोटी तालुक्यातील ५ पूल बांधण्याकरीता १९.१३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.माळशिरस येथील न्यायाधीशांचे निवासस्थानाच्या बांधकामाकरीता ८.९० कोटी तर दुय्यम निबंधक कार्यालय बांधकामास १.६६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विविध विकास कामांकरिता ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.







