दुसरयाचा स्टेटस ठेवण्याऐवजी आपले स्वत:चे स्टेटस निर्माण करा… पीएसआय किशोर चव्हाण
शिक्षण प्रसारक मंडळ संचलितशंकरराव मोहिते महाविद्यालयं अकलूज राज्यशास्त्र विभाग आणि महर्षि प्रबोधिनी, स्पर्धा परीक्षा केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.
मा जयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व मा संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या महाविद्यालयातील विदयार्थ्यांच्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
याहेतुनेच महाविदयालयामध्ये ग्रामिण भागातील मुलामुलींसाठी सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले होते. वेळेचे नियोजन, तासाची विभागणी, अभ्यासाची पुनरावृत्ती, स्वतावरचा विश्वास आणि जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला अधिकारी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आयुष्यातील महत्वाची असलेली वर्ष विदयार्थ्यांनी अभ्यासासाठी दिल्यास कोणतेही यश मिळनारच असेही ते म्हणाले.
व्याख्यानानंतर महर्षी प्रबोधिनीच्या विदयार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पीएसआय किशोर चव्हाण यांनी समर्पक भाषेत उत्तरे दिली.
या व्याख्यान चर्चासत्रासाठी महर्षी प्रबोधिनीचे समन्वयक डॉ विश्वनाथ आवड , डॉ चंकेश्वर लोंढे, डॉ चंद्रशेखर ताटे देशमुख, डॉ सज्जन पवार प्रा अजित चंदनकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विदयार्थी नागन्नाश साळवे यानी तर प्रास्ताविक डॉ लोंढे सर यांनी व आभार प्रदर्शन प्रा अजित चंदनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ दत्तात्रय बागडे, अधिक्षक युवराज मालुसरे, नागन्नाथ साळवे, सत्यजित चव्हाण, समाधान इंगळे यांनी सहकार्य केले.







