• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

भाजप शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. प्रशम कोल्हे यांची निवड.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 14, 2023
in महाराष्ट्र
0
भाजप शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. प्रशम कोल्हे यांची निवड.
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजप शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. प्रशम कोल्हे यांची निवड.

मनोज गायकवाड

भाजपच्या शिक्षक आघाडीच्या प्रदेश संयोजक तथा अध्यक्षपदी डॉ. प्रशम कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. कोल्हे यांची या पदावर नियुक्ती केल्याचे आज मुंबई येथे घोषित केले.डॉ. कोल्हे हे भाजपचे प्रदेश संयोजक आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. उपमुख्यमंत्री श्री फडणवीस आणि श्री भारतीय यांच्यासोबत साधारणतः ३० वर्ष ते भाजपच्या प्रत्येक आघाडीवर कार्यरत राहिले आहेत. १९९६ साली माढा तालुका भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदावर ते कार्यरत होते. त्यानंतर, युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.१९९८ साली त्यांनी युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाची व पुढे प्रदेश उपाध्यक्षपदी पदाची ही धुरा त्यांनी सांभाळली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, तालुका स्तरापासून राज्यस्तरापर्यंत झाला आहे. महाराष्ट्र स्टेट टीचर एज्युकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदावर ते सलग तेरा वर्षे कार्यरत आहेत. शिक्षक आघाडीच्या प्रदेश सहसंयोजक पदावर गेली तीन वर्ष ते काम करीत आहेत. त्यांची आजवरची निष्ठा, संघटनेतील योगदान आणि सतत कार्यरत राहण्याची वृत्ती लक्षात घेऊन, पक्षाने आता त्यांची प्रदेश संयोजकपदी निवड केली आहे

.*कोण आहेत डॉ. कोल्हे?

*सहावा वेतन आयोग लागू होत असताना, कनिष्ठ महाविद्यालयाप्रमाणे अध्यापक विद्यालयांची वेतन श्रेणी निश्चित करून घेण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. २००० साली राज्यात नॅशनल कौन्सिल टीचर एज्युकेशनचे नियम लागू झाले. यावेळी, अध्यापक विद्यालयात नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या सेवा सातत्याबद्दल प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी, डॉ. कोल्हे यांनी सतत पाठपुरावा करून राज्यातील १८५ प्राध्यापकांना सेवा सातत्य मिळवून दिले होते. त्याचबरोबर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात एम. एड. करण्यासाठी अध्यापक महाविद्यालयांसाठीचा असणारा कोठा वाढवून घेतला होता. अध्यापक विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या आंतरवासिता उपक्रमाची सुलभता वाढविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे, शासनाचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत झाली होती. २०१० साली दिल्लीच्या नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने देशभरातील अध्यापक विद्यालयांसाठी निरीक्षण समिती स्थापन केली. या समितीत निवड होणारे देशभरातील अध्यापक विद्यालयातील डॉ. कोल्हे हे एकमेव सदस्य होते. शिक्षण शास्त्र व इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असणारे डॉ. कोल्हे यांनी आपत्ती व्यवस्थापनात पी.एच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या कुटुंबात तीन पिढ्यात शिक्षकी पेशाची परंपरा आहे. गेल्या दोन पिढ्यात शैक्षणिक चळवळीत या कुटुंबाचे योगदान राहिले आहे.प्रदेशाध्यक्ष श्री बावणकुळे, उपमुख्यमंत्री श्री फडणवीस, आमदार श्रीकांत भारतीय यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. पक्षीय राजकारणात पडद्यामागे त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पक्ष वाढीसाठी आमदार भारतीय यांच्या सोबत त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राम सातपुते यांची उमेदवारी आणि विजयात आमदार भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य के. के. पाटील यांच्या साथीने त्यांनी दिलेले योगदान खूप महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्याचबरोबर अक्कलकोट आणि पंढरपूर मंगळवेढ्याच्या पोटनिवडणूकित पडद्यामागची त्यांची भूमिका महत्त्वाची होती. या सर्व बाबींचा विचार करून पक्षाने आता त्यांची शिक्षक आघाडीच्या प्रदेश संयोजक पदी निवड केली आहे या निवडीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री श्री फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते, भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य के. के. पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
भारतीय मराठा संघाने’ आझाद मध्ये जाऊन मराठा वनवास यात्रेला दिला पाठिंबा. 17 तारखेला हजारोंच्या संख्येने मराठा मुंबईत दाखल होणार.

भारतीय मराठा संघाने' आझाद मध्ये जाऊन मराठा वनवास यात्रेला दिला पाठिंबा. 17 तारखेला हजारोंच्या संख्येने मराठा मुंबईत दाखल होणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In