देशाच्या रक्षणार्थ कार्यरत असलेले कमांडो रामेश्वर कदम यांची मुंबई येथे आझाद मैदानावर सुरु असलेल्या वनवास यात्रेला भेट
अकलूज (प्रतिनिधी )मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी 6मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रा सुरु करण्यात आली. तब्बल 500किलोमीटर भर उन्हात पायी चालत ही यात्रा 6जून रोजी मुंबई येथे पोहचली.सध्या मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषण सुरु आहे. या आंदोलनाला 61दिवस पूर्ण झाले आहेत.
या उपोषण ला अनेकांनी पाठींबा दर्शवीला आहे. यात सीमेवर लढणारे जवान देखील मागेनाहीत.देशाच्या रक्षणार्थ कार्यरत असलेले कमांडो रामेश्वर कदम यांनी 6जुलै रोजी या ठिकाणी भेट दिली. तसेच सोबत रात्री घरी बनवलेले जेवण देखील आणले.आणले. पती पत्नी दोघांनी सोबत आझाद मैदानावर जेवण देखील केले. त्याच वेळी तुळजापूर मधून देखील अनेक बांधव आले होते.
यावेळी बोलताना या वनवास यात्रेचे आयोजक योगेश केदार म्हणाले की,शरद पवार साहेबांचा मुंबईतील सभेला आलेले, तुळजापूरचे बांधव आझाद मैदानात सुरू असलेल्या वनवास यात्रेत देखील सहभागी झाले. हे राष्ट्रवादीचे नेते दिवसभराचे त्यांचे कार्य उरकून आमच्या भेटी करिता आले होते. मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनजागृती संदर्भात लोकांमध्ये सुरू असलेल्या सकारात्मक चर्चे बाबत देखील त्यांनी माहिती दिली.
आता सगळीकडे ओबीसी मधूनच आरक्षण अशी चर्चा सुरू झाली आहे असा फीडबॅक मिळाला. या सर्वांना 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण कसे मिळेल? यावर सखोल चर्चा केली. आम्ही इथे आझाद मैदानावर बसून आमच्याकडे जेवढे लोक येतील त्यांना आरक्षण म्हणजे काय? हे समजाऊन सांगत असतो.
सोशल मीडियातून देखील ओबीसी आरक्षण मागणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत आहे. 23 मार्च 1994 रोजी निघालेला ‘जी आर’ याबाबत, राज्यातील फुगीर आरक्षण बाबत सखोल चर्चा झाल्या. या राज्यात सर्व ओबीसी जाती मिळून जास्तीत जास्त 34% च आहेत त्यांना त्यांच्या हक्काचे केवळ 17% च आरक्षण मिळायला पाहिजे होते, तरी त्यांना 32% आरक्षण लागू आहे. त्यात मराठ्यांचा देखील हिस्सा आहे. 23 मार्च 1994 रोजी काढलेल्या एका ‘जी आर’ मुळे मराठ्यांचा हक्क डावलला गेला.
1990 ला मंडल लागू झाला तेंव्हा या राज्यात सर्व ओबीसी जातींना मिळून केवळ 14% च आरक्षण लागू झाले होते. त्यानंतर सलग पाच वर्ष तेवढेच आरक्षण लागू होते पण त्या जी आर मुळे उरलेले मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसींना दिले गेले. ते गेलेले आरक्षण पुन्हा मराठ्यांना मिळावे यासाठी ही मराठा वनवास यात्रा आहे. आम्ही एस सी एस टी समाज बांधवांचे 20% आरक्षण मध्ये आरक्षण मागत नाही आहोत. हेही सर्वांनी लक्षात घ्या. असेही केदार यांनी ठाम पणे सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की,कुणाचे काढून न घेता, असे बोलणाऱ्यानो लक्षात घ्या. ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे. पण आमचा जो हक्क त्यांच्याकडे आहे तो आमचा हिस्सा आम्हाला मिळावा. यापेक्षा दुसरे काही नको. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.












