*विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग महाविद्यालयात पोषण आठवडा साजरा*
अकलूज:येथिल शिवरत्न शिक्षण संस्था संचलित विजयसिंह मोहिते पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये पोषण आठवडा साजरा करण्यात आला. या महाविद्यालयात शिकवले जाणाऱ्या बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमांतर्गतील आवश्यक बाब म्हणून नर्सिंगच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात रुग्णांना आवश्यक असलेले पोषण आहाराचे प्रकार तयार करून त्यातील पौष्टिकांश बद्दल माहिती दिली जाते. मधुमेह, अतिउच्च रक्तदाब, गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयरोगी इत्यादी रुग्णांना अती वेगाने बरे होण्यासाठी पोषण आहार तयार करण्याची पद्धती अवलंबली जाते. प्रकल्पांतर्गत हा उपक्रम नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थांकडून यशस्वी केला जातो. या उपक्रमाच्या निरोपाच्या वेळा शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार यांनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी प्राचार्य डॉ. सुमती, उपप्राचार्य डॉ. प्रसाद पाटील, समन्वयक शिवतीर्थ हिरेमठ यांचा मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा . काशीनाथ चव्हाण, प्रा. रुपाली वाळके, प्रा. रंजना कांबळे, प्रा. गौरी वाघमारे, प्रा. सौ. सनम शेख, प्रा. अक्षय मुंढे, प्रा. रेश्मा शेंडगे, प्रा. ऋतुजा जाधव, प्रा. राजेश्वर माने यांनी परिश्रम घेतले.
चौकट: विविध रुग्णांना आवश्यक भासणारे सत्वयुक पदार्थ बनवणे व त्याची महत्त्व पटवून देणे या बाबींचे विचार करून खाद्यपदार्थ तयार केले जातात. रुग्ण लवकर बरे होण्यासाठी या आहाराचा उपयोग होतो. दर वर्षी साजरा करण्यात येत असलेल्या ‘पोषण आहार आठवडा’ हा उपक्रम आरोग्य विभागात सेवा बजावणाऱ्या नर्सिंग प्रशिक्षणार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल. – शितलदेवी मोहिते-पाटील, अध्यक्षा, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज







