• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या व 5000कोटी ची ठेव असलेल्या शिवकृपा सहकारी पतपेढी ची संचालक मंडळ ची निवडणूक प्रक्रिया सुरु.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 6, 2023
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या व 5000कोटी ची ठेव असलेल्या शिवकृपा सहकारी पतपेढी ची संचालक मंडळ ची  निवडणूक प्रक्रिया सुरु.
0
SHARES
159
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या व 5000कोटी ची ठेव असलेल्या शिवकृपा सहकारी पतपेढी ची संचालक मंडळ ची निवडणूक प्रक्रिया सुरु.

अकलूज (प्रतिनिधी )

महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य असलेली, तसेच 4000पेक्षाही अधीक सभासद असलेली व 5000कोटी ठेव असलेल्या शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई ची 2023-2028साठी संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य चे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी पत्र प्रसिद्ध केले आहे.तर सहकारी संस्था सिडको -मुंबई येथील उप निबंधक प्रताप पाटील हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

या संस्थेची अंतिम मतदार यादी 24-04-2023 रोजी प्रसिद्ध झाली आहे.सर्वसाधारण गट -10.महिलांसाठी राखीव -2.अनु, जाती -जमाती साठी -01.विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघ -01.इतर मागास प्रवर्ग -01अशा एकूण 15संचालक साठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे.नामनिर्देशन पत्र 04-05-2023ते 11-05-2023 पर्यंत सकाळी 11ते दुपारी 3वाजेपर्यंत (फक्त कार्यालयीन कामकाज दिवशी रूम नंबर 221, कोकण भवन बेलापूर येथे दाखल करता येतील.नामनिर्देशन पत्र दररोज दाखल होतील तशी रोज दुपारी 4वाजता प्रसिद्ध केली जातील.तसेच 12-05-2023रोजी दुपारी 12-30वाजता अर्जाची छाननी करण्यात येईल.नामनिर्देशन पत्र ची सूची 15-05-2023रोजी संस्थेच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात येईल. 15ते 29तारखे पर्यंत सकाळी 11ते दुपारी 3पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येतील.30तारखेला सकाळी 11वाजता पात्र उमेदवार यांना निशाणी वाटप करण्यात येतील.आवश्यक असेल तर 11-06-2023रोजी मतदान घेण्यात येईल.तसेच 13तारखेला मत मोजणी करून निकाल घोषित करण्यात येईल.

शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई या संस्थेची स्थापना 1982 साली विक्रोळी (मुंबई) येथे संस्थापक अध्यक्ष कृष्णा शेलार यांनी केली.संस्थेची स्थापना करण्याची संकल्पना शिवमंदिर मध्ये सुचली म्हणून संस्थेचे नाव शिवकृपा असे ठेवले. एक प्रशासकीय कार्यालय, 7 विभागीय कार्यालये तसेच 100 शाखा आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून, त्यातील 42 शाखा ह्या संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. शिवकृपा च्या विक्रोळी, गोरेगाव, ठाणे, पुणे, सातारा, कोरेगाव, माळशिरस या ठिकाणी आलिशान विभागीय कार्यालये असून, प्रत्येक विभागात एक विभागीय अधिकारी नेमले आहेत. महाराष्ट्र मध्ये एकूण 742 पेक्षा अधीक कर्मचारी असून त्यांच्यात 105 विशेष वसुली अधिकारी काम करतात. कोरेगाव येथे संस्थेचे स्वतःचे निवासी प्रशिक्षण केंद्र आहे.संस्थेचा एकूण 5000कोटींचा संमिश्र व्यवसाय झाला आहे.संस्थेची सभासद संख्या जवळपास 4,300 आहे. त्यांना सतत ऑडिट अ वर्ग मिळालेला आहे.

संचालक व कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू आहेत. ग्राहकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते. कर्जमंजुरीची प्रकरणे संचालक मंडळाच्या साप्ताहिक बैठकीत सादर केली जाऊन त्यांना मंजुरी दिली जाते. दर आठवड्याला जवळजवळ 20 कोटीची कर्जे मंजूर होतात. वितरण, वसुली, आणि लेखापरिक्षण इत्यादी बाबीवर देखरेख ठेवण्यासाठी संचालकांच्या वेगवेगळ्या समित्या आहेत. पुणे व सातारा येथील विभागीय कार्यालये प्रशासकीय कार्यालयाशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जोडण्यात आलेली असून, त्याचा उपयोग प्रशिक्षण, बैठका व मुलाखतीसाठी केला जातो.

आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीत असणाऱ्या दादासाहेब साखवळकर पतसंस्था मर्या, ओमकार को ऑप क्रेडीट सोसायटी, कुलस्वामी भैरवनाथ बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या अशा संस्था शिवकृपा मध्ये विलीन करण्यात आल्या आहेत.

शिवकृपा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सण 2016-17 सालचा प्रतिष्ठित सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला, त्याचप्रमाणे सप्टेंबर 2009 मध्ये महाराष्टातील 1 नंबर ची आदर्श व अग्रगण्य पतसंस्था म्हणून शिवकृपा चा गौरव केला. 2017, 2018, 2019 मध्ये सहकारातील उत्कृष्ट कामकाजाकरीता दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. असे नानाविध पुरस्कार शिवकृपा ला मिळाले आहेत. संस्थेने 2017 साली रबाळे नवी मुंबई येथे भव्यदिव्य प्रशासकीय कार्यालय 11 गुंठे चा भूखंड खरेदी केला असून या भूखंडावर तळमजला + 6 मजल्याचे शिवकृपा भवन उभारण्यात आले आहे.

*सामाजिक कार्यात शिवकृपाचा लक्षणीय सहभाग.*

उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयात तसेच केरळमध्ये झालेल्या त्सुनामी वादळामुळे बाधित झालेल्या लोकांकरिता 51 हजार रु. व 25 हजारांची प्रधानमंत्री सहाय्यता निधीस संस्थेने आर्थिक मदत केली.कोविड 19 वेळी 41 लाखांचा धनादेश राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे प्रदान करण्यात आला.संस्थेने सामाजिक वनीकरण मध्ये भरीव कामगिरी केली आहे.सुमारे 1 लाख पारंपरिक वृक्षाची लागवड मान खटाव या दुष्काळी भागात केली आहे.सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात अनेक गावांत सुमारे 2000 नागरिकांना चादरी, बेडशीट व गृह उपयोगीवस्तू तसेच विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू, आणि 50, 000 वह्यांचे वाटप करण्यात आले होते.

विद्यमान अध्यक्ष कृष्णा शेलार यांच्या मार्गदर्शन खाली इतर संचालक मंडळ यांच्या सहकार्याने संस्थेची यशस्वीपणे वाटचाल चालू असून. ठेवीदार देखील दिवसेंदिवस वाढत आहेत.

चौकट :-

संस्थेची 2023-2028 ची संचालक मंडळ निवडणूक आम्ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. परंतु काहीजण खोडसाळ पणाने आमच्यावर भ्रष्टाचार चे आरोप करीत आहेत. परंतु त्यात काहीही तथ्य नाही.

कृष्णा शेलार.अध्यक्ष.शिवकृपा सहकारी पतपेढी.मुंबई.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post

तथागत गौतम बुद्ध यांची जयंती अकलूज येथे विविध उपक्रमाने साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In