*स्त्री-पुरुष समानता जनजागृती महाअभियान* शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपर्वती विकास ट्रस्ट अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यांचा संयुक्त महाउपक्रम एकाच दिवशी १७,१२१ कुटुंबाना भेटून जनजागृती
अकलूज (प्रतिनिधी )शिवरत्न शिक्षण संस्था संचलित विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज, शिवरत्न मॅनेजमेंट इन्स्टुट्युट अँड रिसर्च सेंटर व शिवपर्वती विकास व सेवा ट्रस्ट संचलित द ग्रीन फिंगर्स कॉम्प्युटर कॉलेज अँड रिसर्च सेंटर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने अकलूज व माळेवाडी परिसरातील १७,१२१ कुटुंबाना भेट देवून स्त्री पुरुष भेद न मानता घरोघरी मुलींचे स्वागत केले पाहिजे लिंग गुणोत्तर समान टिकवून ठेवले पाहिजे त्यामुळेच समाजाची व देशाची प्रगती होईल अशी जनजागृती केली. दोनच दिवसापूर्वी शिवरत्न शिक्षण संस्था व डॉटर्स मॉम फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी या तिन्ही कॉलेज मधील NSS च्या विद्यार्थ्यांशी या विषयावर संवाद साधला होता त्यानंतर तीनही कॉलेज चे प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख यांनी *जनजागृती महारविवार* करण्याचे आयोजन केले. त्याप्रमाणे रविवारी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रत्येक घरी काकू ओ काकू अशी हाक मारुन कुटूंबातील महिलांना बाहेर बोलवून स्त्री पुरुष समानतेचे महत्व समजावून सांगत होते . याचवेळी सौ.शीतलदेवी मोहिते पाटील यांचे एक भावनिक पत्र व महाराष्ट्रात प्रथमच ५ते ७ मे रोजी होणाऱ्या ताराराणी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मान्यवर व्हीआयपी निमंत्रण पास देवून सदर स्पर्धेस उपस्थित राहण्याची विनंती करत. या जनजागृती मध्ये ३२४ विद्यार्थ्यांनी व धैर्यशील मोहिते पाटील मित्र परिवार व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे नियोजन संस्था सदस्य अनिल जाधव, रामकृष्ण काटकर, महेश पोरे, मनोहर एकतपुरे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.अनिल लोंढे, प्रा.भारत साठे ,प्रा.विराट गोरे व संस्था प्रशासकीय अधिकारी अश्रफ शेख यांनी केले होते. तर अभियान यशस्वी होण्यासाठी प्रा. हातोळकर मॅडम, प्रा.शिंदे, प्रा.कंगळे, प्रा. कंगळे मॅडम, प्रा.यादव मॅडम, प्रा.वाशिम शेख,प्रा. पाखरे , प्रा.स्नेहा धाईंजे, प्रा.बारबोले, प्रा.धंगेकर,प्रा.मुळीक अजित शिंदे व संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.














