अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती वर विजयसिंह मोहिते-पाटील पॅनलचे वर्चस्व.
धैर्यशील मोहिते पाटील ठरले किंगमेकर.
निवडणूक निर्णय अधिकारी एम. एल शिंदे यांचे ढिसाळ नियोजन.
ए. पी. आय सुनील जाधव यांची पत्रकारांना अपमानास्पद वागणूक.
विजयी उमेदवारांची जंगी मिरवणूक.






अकलूज (प्रतिनिधी )अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती च्या 2023-2028 च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार संघामधील सर्वसाधारण गटातील सात , महिला राखीवच्या दोन, विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय मतदार संघ प्रत्येकी एक जागा अशा सहकारी संस्था मतदार संघातील एकूण ११ जागांपैकी ११ जागांवर, ग्रामपंचायत मतदार संघाच्या तीन, व्यापारी मतदार संघाचे दोन व हमाल तोलार मतदार संघाचा एक असे एकूण १७ जागांवर विजय मिळवित विजयसिंह मोहिते पाटील पॅनलने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. तर माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीने ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाच्या एका जागेवर विजय मिळविला आहे.
अतिशय चुरस निर्माण झालेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत १८ जागांपैकी १७ जागा सत्ताधारी मोहिते-पाटील गटाने तर एका जागेवर माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीने विजय मिळवला आहे.या निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील पॅनलचे मदनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह १७ तर माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीचे उत्तम जानकर विजयी झाले आहेत.
*सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गटाचे विजयी उमेदवार.*
मदनसिंह मोहिते-पाटील (१०४३), मारुतराव रुपनवर (१००९), शिवाजी चव्हाण (१०१६), नितीन सावंत (९९५), बाबुराव कदम (१०२०), बाळासो माने देशमुख (१०१७), लक्ष्मण पवार (१००३)तर पराभूत उमेदवार : नागेश काकडे (६३६), उत्तम जानकर (६७८), बाळासाहेब सावंत (६०८), गणेश इंगळे (६३६), पांडुरंग पिसे (६३३), पांडुरंग वाघमोडे (६३३), दादासाहेब लाटे (६२०),
*महिला राखिव मतदार संघामध्ये.*
मेघा साळुंखे (१०४५), अमृता सुरवसे (१०२०) यांचा विजय झाला असून पद्मजादेवी मोहिते-पाटील (६९९), सोनाली पाटील (६७८), यांचा पराभव झाला आहे.*
इतर मागासवर्गीय मतदार संघातून.*
भानुदास राऊत (१०६०) हे विजयी झाले आहेत तर भीमराव फुले (६८२) यांचा पराभव झाला आहे.
*सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती गटातील.*
संदीप पाटील (१०७६) हे विजयी झाले आहेत तर अजित बोरकर (६६१) यांचा पराभव झाला आहे.
*ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटामध्ये.*
बापूराव पांढरे (५४८), शहाजीराव देशमुख (५९५) हे दोघे विजयी झाले असून पदमजादेवी मोहिते-पाटील (४६१), केशवराव पाटील (४८१) यांचा पराभव झाला आहे. *अनुसुचित जाती जमाती गटामध्ये.*
उत्तम जानकर (५५४) यांचा विजय तर दत्तूराम लोखंडे (५२४) यांचा पराभव झाला आहे.
*आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये.*
पोपट भोसले (५८५) यांचा विजय तर यशवंतराव घाडगे (४९०) यांचा पराभव झाला आहे.
*व्यापारी मतदार संघामध्ये.*
आनंदा फडे (३१५), महावीर गांधी (३१९) हे दोघे विजयी तर मोहसीन बागवान (१९), दिपक गरड (९२) हे पराभूत झाले आहेत.
*हमाल तोलार मतदार संघामध्ये.*
उध्दव डांगरे (१४४) हे विजयी तर संजय कोळेकर (०५) हे पराभूत झाले आहेत.ग्रामपंचायत मतदारसंघाच्या मतमोजणीवर हरकती घेतल्याने या मतदारसंघाची फेरमतमोजणी केली गेली. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला.
*चौकट :-*
*धैर्यशील मोहिते पाटील ठरले किंगमेकर.*
निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपा चे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्व गटातील मतदार यांचेपर्यंत पोहचून गाठी -भेटी घेत अचूक रणनीती आखली होती. तसेच प्रचारात देखील आघाडी घेतली होती. या निवडणुकीत खऱ्या अर्थाने ते किंगमेकर ठरले.
*चौकट :-*
*निवडणूक निर्णय अधिकारी एम. एल शिंदे यांचे ढिसाळ नियोजन.*
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीच्या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून 10.30 पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पत्रकारांना ही येऊ दिले नाही.अनेक पत्रकारांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतर त्यांना आत सोडण्यात आले. परंतु तेथे बसण्याची व इतर कोणतीही सोय केली गेली नव्हती. त्यामुळे पत्रकारांना ऊन वारा व पावसाचा सामना करत वार्तांकन करावे लागले.त्यामुळे सर्व पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.
*चौकट :-*
*ए. पी. आय सुनील जाधव यांची पत्रकारांना अपमानास्पद वागणूक.*
या निवडणुकीसाठी अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांनी मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. परंतु या ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी हजर असलेले ए. पी. आय. सुनील जाधव यांनी मात्र या निवडणूकी चे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली. अनेक पत्रकारांना गोडाऊन मध्ये जाण्यास मज्जाव केला. तर काही पत्रकारां बरोबर बाचाबाची केली. एव्हढेच नव्हे तर काही पत्रकारांचे मोबाईल हिसकावून घेतले.इतर व्यक्तींना आतमध्ये सोडले जात होते. परंतु पत्रकारांना मात्र कायदा दाखविला जात होता. त्यामुळे पत्रकारांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
*चौकट :-*
*विजयी उमेदवारांची जंगी मिरवणूक.*
विजयसिंह मोहिते पाटील पॅनल मधील विजयी झालेल्या सर्व उमेदवारांची बाजार समिती ते शिवरत्न बंगला पर्यंत प्रमुख मार्गांवरून गुलालाची उधळण करीत, फटाक्यांची आतिषबाजी करीत जीप गाडीतून भव्य मिरवणूक काढीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. सर्व विजयी उमेदवारांचा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.










