अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुपवाड एमआयडीसी मधील सिम्बायोसिस कंपनीला भेट
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कंपनीतील विविध विभागाची माहिती घेतली. कंपनीचे संचालक व कर्मचारी यांनी कंपनीतील सर्व उत्पादनांची तसेच सर्व विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.यामध्ये प्रोडक्शन, क्वालिटी, पॅकिंग, लेबलिंग, इन्स्पेक्शन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा विविध डिपार्टमेंटची माहिती दिली. तसेच कंपनीतील एंट्री आणि एक्झिट प्रोसिजर, गाऊनिंग प्रोसिजर, सॅनिटेशन व हेल्थ हायजिन, प्रायमरी पॅकिंग, सेकंडरी पॅकिंग, रॉमटेरियल स्टोरेज व प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर योग्य उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले. या कंपनीला भेट दिल्याने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडली. या भेटीस महाविद्यालयातील 46 विद्यार्थ्यासोबत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मुकुंद गाडे, प्रा महेश मिटकल प्रा बापूराव अंकलगी प्रा नेहा काजळे प्रा स्नेहल काशीद व सुषमा शिंदे उपस्थित होते.








