कोडोली च्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने घेतलेल्या शैक्षणिक साधन निर्मिती स्पर्धेत सीमा चोपडे प्रथम क्रमांकाच्या विजेत्या
कोडोली, ता. 18 :
येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्स वा चे औचित्य साधून घेण्यात आलेल्या शैक्षणिक साधन निर्मिती स्पर्धेत सीमा चोपडे या विद्यार्थी – शिक्षिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. पेठवडगाव ( ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील सावित्रीबाई फुले महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अस्मिता पाटील आणि प्रा. सुनीता बा ण दा र यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तिपत्र केदेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : प्रथम – सीमा चोपडे, द्वितीय – मानसी जाधव, तृतीय – राधिका निकम , उत्तेजनार्थ – प्रदीप कांबळे, उल्लेखनीय – गजानन लोहार. याप्रसंगी प्रा. एस. डी. र क्ता डे, प्राध्यापिका जी. के. मुजावर, प्रा. संजय जाधव व्यासपीठावर होते. पद्मश्री रा ज गों डा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शैक्षणिक तंत्र विभागाचे प्रमुख प्रा. अजित लो क रे यांनी आभार मानले.







