खोडसाळ विरोधक पुन्हा तोंडघशी ; मदनसिंह मोहिते पाटील व बाबाराजे देशमुख यांच्या विरोधातील आक्षेप फेटाळले, निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा
अकलूज : खोडसाळपणाने आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय लागलेल्या विरोधकांवर पुन्हा एकदा तोंडपेशी पडण्याची नामुष्की ओढावली. सभापती मदनसिंह मोहिते पाटील व बाबाराजे देशमुख व मामासाहेब पांढरे यांच्या विरोधात उत्तम जानकर यांच्याकडून घेण्यात आलेले आक्षेप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळल्याने सत्ताधाऱ्यांचे पारडे अधिकच जड झाले आहे.केवळ विरोधासाठी विरोध करायचा या हेतूने उत्तम जानकर यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी मदनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे उर्फ शहाजीराव देशमुख, मामासाहेब ऊर्फ बापूराव पांढरे यांच्या विरोधात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किरण गायकवाड यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरवण्याबाबत अपील केले होते.सदर अपिलावर निर्णय देताना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी जानकर यांच्या आरोपात कसलेही तथ्य आढळून येत नसल्याने व मदनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख,मामासाहेब पांढरे यांचे अर्ज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसारच असल्याने ते वैध ठरवण्यात येत असून जानकर यांचे अपील फेटाळण्यात येत असल्याचे आदेश पारित केले आहेत.जानकर यांचे अपील फेटाळल्यामुळे सत्याधाऱ्यांच्या विरोधात खोडसाळपणे लढण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न अपयशी झाला आहे. त्यामुळे ते चांगलेच तोंडघशी पडल्याची भावना सत्ताधारी गटाकडून व्यक्त होताना दिसत आहे.






