उष्माघात आणि होमिओपॅथी… डॉ.योगिता पवार (होमिओपॅथी तज्ञ)
उष्माघात ही उन्हाळ्यातील एक सामान्य समस्या आहे.खूप वेळ उन्हात काम केल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात आणि उष्मा पात.अनेक दिवस सतत कडक उन्हात काम केल्यानंतर उष्माघात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजे उष्मापात.भारतात सर्वसाधारणपणे तीन ऋतू असतात .उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा, मार्च,एप्रिल,मे आणि जून हा उन्हाळ्यामध्ये गणला जाऊ शकतो आणि याच काळामध्ये उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. उष्माघाताची कारणे…तीव्र सूर्यप्रकाश किंवा अति उष्णतेमुळे उष्माघात होतो. त्यामुळे शरीराचे तापमान सामान्य पेक्षा जास्त होते. थायरॉईडचे असंतुलन शरीरातील रक्तशर्करा पातळी कमी झाल्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते (मधुमेही रुग्णांमध्ये). मद्यपान,उच्च रक्तदाब ,हृदयविकार या सोबतच अवसाधविरोधी औषधांचा नियमित वापर केल्यानेही उष्माघात होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणे.. डोकेदुखी चक्कर येणे त्वचा,नाक,शरीर कोरडे पडणे. जास्त घाम येणे.उलट्या होणे. रक्तदाब वाढणे. स्नायू पेटके आणि कमजोरी मूर्च्छा येणे चिडचिडेपणा वाढणे. उष्माघातास सामोरे जाणारे रुग्ण.. नवजात बालके वयस्कर लोक बाहेर उन्हामध्ये काम करणारे कर्मचारीजाड व्यक्ती मद्यपान करणारी मद्यपी मनोरुग्ण ज्यांना मुळातच पाणी पिण्याची सवय कमी असणारी लोक.प्रतिकारशक्ती कमी असणारे जुनाट व्याधीग्रस्त.. उष्माघात टाळण्यासाठी… भरपूर पाणी पिणे. मद्यपान घेत असाल तर दारू बंद करणे उसाचा रस,कलिंगड ,टरबूज ,नारळ ,पाणी ,लिंबू पाणी ,ताक ,द्राक्ष, दही इत्यादींचे सेवन जास्त प्रमाणात करणे.इलेक्ट्रॉल द्रावण घेणे रुग्णाला थंड पाण्याने अंघोळ घाला.. उन्हापासून घ्यावयाची काळजी… सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते तेव्हा शक्यतो उन्हात फिरणे ,काम करणे किंवा खेळणे टाळावे .सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी करून ती कामे करा .जवळ पाण्याची बाटली ठेवा डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधावा. सैलसर ,सौम्य रंगाचे कपडे वापरा. छत्रीचा वापर करा. साखरेचे,अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली पेये बंद करा ,त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. प्रथमोपचार …शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत व थंड ठिकाणी हलवावे .शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत .शरीर ओल्या कापडाने पुसून घ्यावे. व्यक्तीवर थंड पाण्याचा वर्षाव करावा. व्यक्ती बेशुद्ध असेल तर श्वसनक्रियेची तपासणी करावी. व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्यास पाणी पिण्यास द्यावे..होमिओपॅथिक औषधोपचार..1) ग्लोनायन… व्यक्ती उष्माघाताने बेशुद्ध होते, घाम भरपूर येतो .व्यक्तीचा चेहरा गरम आणि हातपाय थंड असतील तर ग्लोनायन हे होमिओपॅथिक औषध द्यावे.2.ऍकोनायट ..या पेशंटला अचानक सूर्याच्या प्रखर उष्णतेने त्रास सुरू होतो. अचानक शरीराचे तापमान वाढते .चेहरा लाल उष्ण असतो रुग्ण घाबरलेला असतो अशा प्रकृतीच्या रुग्णास एॅकोनाइठ हे होमिओपॅथिक औषध लागू पडते.3) बेलाडोना.. या रुग्णांमध्ये अचानक आणि तीव्र लक्षणे असतात अतिशय तीव्रप्रकारची डोकेदुखी असते. उन्हामुळे उलटी, मळमळ असते त्याचबरोबर सतत थंड पाणी प्यावेसे वाटते. निष्काळजीपणा अशा रुग्णांमध्ये जास्त असतो अशा रुग्णामध्ये बेलाडोणा हे होमिओपॅथिक औषध चांगल्या प्रकारे काम करू शकते..4) नॅट्रम मुर… शाळकरी मुलींमध्ये उन्हामुळे डोकेदुखी. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. रक्तक्षय राहतो सकाळी 11 वाजता डोके दुखण्यास सुरुवात होते .अति विचार, चंचलता रागीट स्वभावाच्या व्यक्तीस हे औषध दिल्यास त्यास फायदा होऊ शकतो. या वरील होमिओपॅथिक औषधाबरोबरच जलसेमियम, नॅट्रम कॉरब, ब्रायोनिया, नक्स ओमिका, अर्सेनिक अल्बम ही होमिओपॅथिक औषधे व्यक्ती परत्वे ,रुग्णांच्या लक्षणानुसार व स्वभावानुसार दिल्यास उष्माघातापासून बचाव करण्यास मदत होते. होमिओपॅथिक औषधे घेत असताना तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.
..डॉ.योगिता कुलदिप पवार होमिओपॅथि तज्ञ..
.आयुष्या होमिओपॅथिक क्लिनिकउमळवाड जयसिंगपूर जि.कोल्हापूर..







