अन्न आणि औषधे ग्राहक कल्याण समितीच्या महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि फिटनेस सेलच्या अध्यक्षपदी धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड.
अकलूज (प्रतिनिधी )

सोलापूर जिल्हा भाजपा चे संघटन सरचिटणीस, सोलापूर जिल्हा नियोजन समिती चे सदस्य, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिवामृत सहकारी दूध संघाचे चेअरमन धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांची अन्न आणि औषधे ग्राहक कल्याण समितीच्या महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि फिटनेस सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र संदर्भ क्रमांक FDCWC / APL/ 1033/2023 अन्वये 14/04/2023 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर व्ही. मोरे यांनी दिले आहे. अन्न व औषध ग्राहक कल्याण समितीच्या महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि फिटनेस सेलच्या अध्यक्षपदी सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली आहे.क्रीडा व आरोग्य क्षेत्रात सातत्याने करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.FDCWC समिती ही एक ना- नफा देणारी संस्था आहे जी ग्राहक संरक्षण कायदा 2019, (भारत सरकार) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहकांचे हक्क आणि संरक्षणासाठी कार्य करते. अन्न आणि औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता तसेच आरोग्यावर परिणाम करणाऱ्या हानिकारक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणारी ही संस्था आहे.दरम्यान या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.14 एप्रिल 2023 ते 13 एप्रिल 2024 पर्यंत असा एक वर्षासाठी कार्यकाळ सोपविण्यात आला आहे.दरम्यान ही नियुक्ती करण्यात आल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले की, FDCWC सोबत वरिष्ठाच्या मार्गदर्शन खाली समाधानकारक आणि प्रामाणिकपणे काम करणार आहे. आणि ग्राहक संरक्षणासाठी आवश्यक सामाजिक- कायदेशीर उपाययोजना केल्या जातील.दरम्यान या निवडीबद्दल समिती चे राष्ट्रीय अध्यक्षसुधीर व्ही. मोरे,महाराष्ट्र राज्याचे प्रेसिडेंट संदीप नाईक,राज्य क्रीडा आणि फिटनेस सेलच्या राष्ट्रीय व्हा. प्रेसिडेंट लिना मोगरे,संजय कुक्कर,राष्ट्रीय हेड उदय स्वामी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.







