प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांना होमिओपॅथीतील योगदानाबद्दल डॉ.सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने जर्मनी येथे सन्मानित..
.दि 10 एप्रिल रोजी होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या 268 व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या मूळ जन्मस्थळी माईसन, जर्मनी या ठिकाणी डॉ. अंड्रिस जंग यांच्या हस्ते डॉ.सॅम्युअल हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने पुणे येथील प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांना सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमरसिंह निकम हे चाळीस वर्ष होमिओपॅथीद्वारे रुग्णांची सेवा करत आहेत. होमिओपॅथीमध्ये संशोधन करून होमिओपॅथी मधील पहिले खाजगी 100 बेडचे आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल चालवत असून हजारो हृदय, किडनी, लिव्हर फेल्युअर यांसारख्या असाध्य रोगांना बरे करत जागतिक पातळीवर होमिओपॅथीला उत्तम आणि उच्च दर्जा देऊन होमिओपॅथी शास्त्राला तळागाळापर्यंत त्यांनी पोहोचविले आहे. मिशन होमिओपॅथी संघटना स्थापन करून शंभर डॉक्टरांची टीम तयार केली , जी जगभर मोठमोठ्या शहरात, खेड्यापाड्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने होमिओपॅथीचा प्रसार करण्याचे योगदान निरंतर करत आहे. कोविड सारख्या महामारीत दिवस-रात्र निर्भीडपणे कोविड महामारी थोपवण्याचे काम डॉ.अमरसिंह निकम यांनी केले.डॉ.अमरसिंह निकम यांना सन 2017 साली महाराष्ट्र शासनाने डॉ.सॅम्युअल हनिमन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं असून त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी मोफत होमिओपॅथिक औषधोपचार शिबीराचे आयोजन करून अनेक पिडीत रुग्णांना दिलासा दिला आहे.जर्मनी येथील झालेल्या कार्यक्रमात डॉ. मनिष निकम,सौ.डॉ. मनस्वी म. निकम आणि डॉ. सतीश म्हस्के यांनी होमिओपॅथीच्या शोधनिबंधावर आपले व्याख्यान दिले. यावेळी सौ.सुधा अमरसिंह निकम आणि युरोप मधील असंख्य होमिओपॅथिक तज्ञ उपस्थित होते. हा सोहळा आय. एच. झेड. टी. या संस्थेने आयोजित केला होता.या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण भस्मे,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी,सदस्य डॉ बाळकृष्ण गायकवाड,डॉ. प्रतिक तांबे, सल्लागार समितीचे सदस्य डॉ. मनीष पाटील, डॉ. मनोज रांका, डॉ. प्रमोदिनी पागे इ.अभिनंदन केले असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







