• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

10 एप्रिल होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानिमन यांच्या जयंतीनिमित्त…. होमिओपॅथी : एक वरदान. डॉ. बाळकृष्ण गायकवाड

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 9, 2023
in महाराष्ट्र
0
10 एप्रिल होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानिमन यांच्या जयंतीनिमित्त…. होमिओपॅथी : एक वरदान. डॉ. बाळकृष्ण गायकवाड
0
SHARES
71
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

10 एप्रिल होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानिमन यांच्या जयंतीनिमित्त…. होमिओपॅथी : एक वरदान.

.. सतत होणाऱ्या शारीरिक व्याधीमुळे त्रासून गेला असाल , तर अशा रुग्णांना होमिओपॅथिक औषध योजना ही खरोखरच वरदान आहे. शारीरिक तक्रारी अनेकविध ; परंतु औषध मात्र एकच. रोगनिवारण होत असताना शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवणे, रोगामुळे निर्माण झालेले मनोदौबल्य नाहीसे करणे हे होमिओपॅथिक औषधाचे वैशिष्ट्ये म्हणता येईल.. होमिओपॅथी ही उपचार पद्धती म्हणजे जर्मन डॉ.सॅम्युएल हानिमन यांनी जगाला दिलेले एक वरदान आहे. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनी येथे झाला. त्यांनी वयाच्या 35 व्या वर्षी होमिओपॅथीचा शोध लावला. या उपचार पद्धतीमध्ये निरोगी व्यक्तीमध्ये रोगसदृश्य स्थिती निर्माण करणारी औषधी पदार्थ रोगी व्यक्तीमध्ये आजार बरा करण्यासाठी वापरता येतात. निरोगी व्यक्तीमध्ये निर्माण झालेली आजाराची लक्षणे त्याच्या तीव्रतेनुसार नोंद करून ठेवली जातात. या लक्षणांशी सामर्थ्य दाखवणारी लक्षणे जेव्हा रोगी व्यक्तीत निर्माण होतात , तेव्हा त्या विशिष्ट औषधाचा वापर करून आजार बरा केला जातो. “व्यक्ती तितक्या प्रकृती” या तत्त्वावर होमिओपॅथीचा उपचार अवलंबून असतो.त्यामुळे प्रत्येक रुग्णाची शारीरिक आणि मानसिक जडणघडण समजावून घेऊन मगच योग्य औषध निवडता येते. प्रत्येक व्यक्ती ही भावनिक जडणघडण, वर्तणूक,आकांशा,खाण्यापिण्याच्या व इतर आवडीनिवडी,छंद आणि बौद्धिकता अशा अनेक पैलूंमुळे दुसऱ्या व्यक्ती पेक्षा वेगळी असते. प्रत्येकाची प्रकृती व आजार हे पण वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतात. जसे एखाद्याची अंगदुखी हालचाल केल्याने कमी होते, तर कोणाची विश्रांतीने.एखादा ताप आलेला रूग्ण जाड पांघरून घेईल,तर दुसरा तापातही पंखा लावायला सांगेल. एखाद्याला सांध्यामध्ये टोचल्यासारखी वेदना होतील. कुणाला ठणकल्यासारख्या,तर कुणाला ओढल्यासारख्या थोडक्यात,आजार एकच असला तरी त्याची लक्षणे, स्वरूप लक्षणांची तीव्रता,त्रास कमी- जास्त करणारे घटक प्रत्येक माणसात वेगवेगळे असतात. मग एकच औषध सगळ्यांना कसे लागू पडेल ? म्हणून होमिओपॅथिक औषधांची निवड केवळ रोगावरून होत नसून, प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक वेगळेपणा विचारात घेऊन असते.होमिओपॅथिच्या तत्वानुसार आजाराची संकल्पना म्हणजे सर्व प्राणिमात्रामध्ये एक विशिष्ट उर्जा सतत कार्यरत असते.या ऊर्जेला चैतन्यशक्ती (व्हायटल फोर्स) म्हटले जाते.ही चैतन्य शक्ती शरीरातील विविध संस्थांमध्ये समन्वयाने काम करीत असते.चैतन्य शक्तीचे शरीरातील विविध पेशींमधील सुसंवाद,पेशीचे नवनिर्माण व नाश , संप्रेरकाची रक्तातील योग्य पातळी यावर नियंत्रण असते.या चैतन्य शक्तीचे संतुलन कोणत्याही बाह्य अथवा अंतर्गत कारणाने बिघडल्यास शरीरातील समन्वयाची स्थिती बिघडते आणि रोग निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते.काही आजार तात्पुरत्या स्वरूपाचे (उदा.ताप, सर्दी, खोकला), तर काही गंभीर स्वरूपाचे (दमा, संधिवात, रक्तदाब, कर्करोग) असतात. आजारामुळे निर्माण झालेली लक्षणे अथवा लक्षण समूह यांचा अभ्यास करून त्यानुसार औषधाचे व औषधाच्या शक्तीची निवड करण्यात येते. हे औषध दिल्यावर शरीरात कार्यरत असलेल्या विविध पेशी उद्दीपित होतात आणि रोगाचा प्रतिकार करून त्याचा नाश करण्यास सक्षम बनतात.अनेक असाध्य व कष्ट साध्य रोगावर होमिओपॅथिक औषधे प्रभावीपणे कार्य करतात. एवढेच नव्हे, तर अतिशय जलद गतीने रोग निवारण करतात .तात्पुरत्या आजारामध्ये त्वरित गुण येण्यासाठी औषधांची आणि औषधांच्या शक्तीची अचूक निवड करावी लागते. डॉक्टरांचा अनुभव अथवा ज्ञान कमी असल्यास बऱ्याचदा गुण येण्यास वेळ लागतो.स्वतः रुग्णाने सुद्धा आपल्या आजाराची बारीक-सारीक माहिती लक्षात ठेवून डॉक्टरांना सांगणे आवश्यक असते. त्यामुळे डॉक्टरांना योग्य औषध निवडण्यास मदत होते. जुनाट व्याधीत सुद्धा याच गोष्टींची आवश्यकता असते. आजाराची लक्षणे, विशेषतः त्वचारोगात जर बाह्य उपचारामुळे सुप्ताअवस्थेत असतील, तर होमिओपॅथिक औषधाने ती आधी उफाळून येतात व नंतर हळूहळू आजार कमी होत जातो. आजाराची तीव्रता,व्याप्ती आणि कालावधी यावर गुण येण्याची वेळ ठरते.आजाराची निर्मिती अनुवंशिकता, प्रतिकारशक्तीचा ऱ्हास किंवा पर्यावरण या तिन्ही बाबीवर अवलंबून असते. प्रत्येक आजारात जादूसारखा गुण येणे शक्य नसते.औषध वेळेवर घेणे, पथ्य पाळणे आणि थोडा दम धरणे या बाबी आवश्यक असतात.औषधांची अयोग्य निवड आणि अयोग्य शक्तीची औषधे घेतल्यास शरीरात बिघाड निर्माण होऊ शकतो. होमिओपॅथिक औषधे होमिओपॅथिक तज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. होमिओपॅथिक औषधे ही घेण्यास अत्यंत सोपी असतात. ही औषधे गोड असतात.लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्व वयोगटांमध्ये होमिओपॅथिक औषधाने इलाज करता येऊ शकतो. रोग प्रतिकाशक्ती वाढते. महत्त्वाचे म्हणजे होमिओपॅथिक तज्ञ अनुभवी असणे आवश्यक असते………………………………………………. डॉ.बाळकृष्ण एन.गायकवाड एमडी होमिओपॅथी (पुणे)मा. उपाध्यक्ष महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबईप्रशासकीय सदस्य महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई पत्ता. द्वारका होमिओपॅथिक हॉस्पिटल मोतीराम कॉम्प्लेक्स,पौड रोड ,मेट्रो स्टेशन समोर ,कोथरूड पुणे 38 संपर्क 99 21 93 91 91 मेल.. gaikwadbn78@gmail.com

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
म्हसवड येथे प्रशांत माळवदे यांचा  जेष्ठ पत्रकार विजय टाकणे यांच्या हस्ते सत्कार

म्हसवड येथे प्रशांत माळवदे यांचा जेष्ठ पत्रकार विजय टाकणे यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In