*ग्रीन फिंगर्स कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम संपन्न*
ग्रीन फिंगर्स कॉलेजमध्ये बीसीए व बीसीएस द्वितीय व तृतीय वर्षात एम.एस सी (कॉम्प्युटर ) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहा दिवसीय सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम चे आयोजन करण्यात आले .विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेली विशेषता तसेच इतर गुणवैशिष्ट्य जी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात इतरांशी संवाद साधताना तसेच आपल्या निवडलेल्या क्षेत्रात नोकरी व्यवसायामध्ये यशस्वी होण्यास मदत करतात .याचे महत्त्व ओळखून महाविद्यालयाने सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चे सहा दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यामध्ये संवाद कौशल्य ,नेतृत्व , संघटन कौशल्य , समस्या सोडवण्याचे कौशल्य , व्यवस्थापन कौशल्य इत्यादीचे मार्गदर्शन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून करण्यात आले .यामध्ये रुबिकॉन पुणे येथील ट्रेनरनी विद्यार्थ्यांना टीम बिल्डिंग ,ग्रुप डिस्कशन , प्रेसेंटेशन्स स्कील इत्यादी कौशल्य ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकविले .या प्रशिक्षणामध्ये रुबीकॉन पुणे येथील श्री अमृत कुलकर्णी, श्री अर्षद मिर्झा बेग , भक्ती फडते, श्री प्रवीण पार्वती , यांनी सहा दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल मग नोकरी असो वा व्यवसाय विद्यार्थ्यांच्या अंगी सॉफ्ट स्किल मधील कौशल्य असणे खूप गरजेचे आहे .करियर घडवण्यासाठी कौशल्याचा विकास करण्याशिवाय पर्याय नाही .स्पर्धात्मक युगात राहायचे असेल तर सॉफ्ट स्किल चा विकास केल्याशिवाय यशस्वी होता येत नाही .एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, रोजगारक्षमता याबद्दल वाचलं. पण, हे सॉफ्ट स्किल्स, एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आजकाल कंपन्यांना शैक्षणिक पात्रतेबरोबरच आणखी काही विशिष्ट गुणांची/ कौशल्यांची (स्किल्स) गरज असते. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक मजल सर करताना या स्किल्स खूप महत्त्वाच्या ठरतात. नुसतंच तांत्रिक किंवा विषयाचं ज्ञान असून चालत नाही, म्हणजेच नुसत्याच पुस्तकी ज्ञानावर नोकरी मिळवणं आणि टिकवणं आता कठीण झालं आहे. पदवी मिळवल्यावर आपण गृहीत धरू शकतो की विषयाचं ज्ञान असेल. पण, विषयावरच्या प्रभुत्वावर आपण बोलू शकत नाही. ऑफिसमध्ये काम करण्यासाठी लागणारं कौशल्य (स्किल्स) ही वेगळीच असतात .हे सर्व कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी यावं म्हणूनच महाविद्यालयाने महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्ष श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले .या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयीन प्लेसमेंट सेल चे प्राध्यापक श्री बाळासाहेब क्षीरसागर बोलताना म्हणालेनुसतंच टेक्नॉलॉजीवर प्रभुत्व असून चालत नाही. पण, संभाषण कौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स), लेखन कौशल्य, प्रेझेंटेशन स्किल्स, निर्णयक्षमता (डिसिजन मेकिंग स्किल्स), सर्जनशीलता (क्रिएटीव्ह स्किल्स), समूहात/लोकांबरोबर काम करण्याचं कौशल्य (टीम स्किल्स/ इंटरपर्सोनल स्किल्स), भावनिक बुद्धिमत्ता (इमोशनल इंटेलिजन्स), नेतृत्व गुण (लीडरशिप स्किल्स), वेळेचं नियोजन (टाइम मॅनॅजमेंट), समस्यांचं निरसन करण्याची क्षमता (सोल्युशन ओरिएंटेशन/ प्रॉब्लेम सोलविंग), नेटवर्किंग स्किल्स म्हणजेच लोकांशी असलेला आपला संबंध, तणाव हाताळण्याची क्षमता (स्ट्रेस मॅनॅजमेंट) असे आणि असे बरेच कौशल्य आज करिअर टिकवण्यासाठी गरजेचे आहेत ते या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण पद्धतीने शिकवण्यात आले .या कार्यक्रमाप्रसंगी बीसीएस विभाग प्रमुख प्राध्यापक श्री संजय साळुंखे बोलताना म्हणालेआजचा काळ हा ग्लोबल बिझनेसचा काळ आहे, त्यात आपण फक्त कोणत्या एका विशिष्ट प्रांतातील किंवा फक्त आपल्या देशातील लोकांबरोबर देवाणघेवाण करत नाही तर आंतरराष्ट्रीय बिझनेसच्या संपर्कात येतो. वेगवेगळे देश, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती किंवा परदेशात जाऊन वास्तव्य करणं…अशी वेळ आल्यास हे सगळे स्किल्स जर आत्मसात केले असतील तर एक यशस्वी करिअर घडवण्यात कोणतीच अडचण येत नाही.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक श्री गणेश वाघमोडे ,श्री अतुल माने , श्री .योगेश पाखरे, रिजवाना काझी यांनी विशेष परिश्रम घेतले .







