विजयवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटी च्या व्हाईस चेअरमन पदी किरण प्रमोद गिरमे यांची बिनविरोध निवड
अकलूज (प्रतिनिधी )लोकनेते प्रतापसिंह शंकराव मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष, प्रेरणास्थान,युवकांचे हृदयसम्राट डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली *विजयवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटी चेअरमन ,व्हॉइस चेअरमन व संचालक मंडळाची निवड बिनविरोध करण्यात आली.* यावेळी नूतन चेअरमन पदी दत्तात्रय(काका) यशवंत इंगळे,व्हाईस चेअरमन पदी किरण प्रमोद गिरमे(मा.सरपंच)यांची सर्व संचालक मंडळातून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित आजी माजी संचालक व ग्रामस्थ यांनी नूतन संचालक यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






