अकलूजच्या कृषि उत्पन्न बाजार समिती मधील भगव्या जातीच्या डाळींबला प्रतिकिलो मिळाला 151₹उच्चांकी दर अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील शंकरराव मोहिते कृषी उत्पन्न बाजार कमिटीकडे डाळींबाला प्रती किलो ला मिळाला १५१/—₹ उच्चांकी दर .अकलुज येथील मार्केट कमिटीकडे डाळींब बाजार तेजीत असुन सोनवणे अक्षय बाबासो यांचे गणेश फ्रुट कंपनीकडे रामचंद्र चोरमले माळशिरस यांचे भगव्या जातीच्या डाळींबास प्रती किलो १५१/—₹ भाव मिळाला असुन, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मिळणार्या वाढीव दरामुळे बाजार कमिटीकडे डाळींबाची आवक वाढु लागली आहे त्याप्रसंगी सोनवणे आण्णा,भैय्या माढेकर, कोकरे ,बालाजी इंगळे ,नागेश केदार इं व्यापारी हजर होते. याबद्दल माजी सभापती मदनसिंह मोहिते पाटील ,सचिव राजेंद्र काकडे यांनी समाधान व्यक्त केले.







