*एस टी महामंडळातील बस चालक व वाहक यांच्या रात्रवस्ती भत्त्यांत एस टी महामंडळ व मान्यताप्राप्त संघटनाशी चर्चा करुन लवकरच वाढ करणार तर मुक्कामी ठिकाणाच्या असुविधेत सुधारणा करण्याच्या तत्काळ सुचना…**आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे प्रश्नावर सरकारच्या वतीने मंत्री दादा भुसे यांचे उत्तर.*
अकलूज -प्रतिनिधी ;राज्यात सुमारे ७,२०० एस टी बस शेवटच्या ठिकाणी मुक्कामाला असतात सोलापुर जिल्ह्यातील २०० एस टी बस रात्री शेवटच्या बसस्थानकावर मुक्कामी असतात.सदरहु चालक व वाहकांना गावाच्या ठिकाणी रुपये ७५ रु तालुक्याच्या ठिकाणी रुपये ८० रु व शहराच्या ठिकाणी १००रु रात्रवस्ती भत्ता दिला जातो हा भत्ता तुटपुंज्या स्वरूपाचा असुन राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक-वाहकांना अत्यल्प वेतन असताना गत चार वर्षांपासून रात्रवस्ती भत्त्या वाढ करण्यात करण्यात आलेली नाही त्यात वाढ करण्यात यावी. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी विश्रामगृहांची आणि स्वच्छतागृह यांची अवस्था बिकट असुन त्याची सुधारणा करण्यात यावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नादवारे केली होती.यावर सरकाच्या वतीने मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना राज्य परिवह महामंडळातील वाहक व चालकांच्या भत्त्यांबाबत दर चार वर्षानी निर्णय घेवुन अंमलबजावणी होत असते पण एसटी महामंडळ आणि मान्यताप्राप्त संघटना यांचेत समझोता झालेला भत्त्यातील वाढ झालेली नाही त्यामुळे पुन्हा एस.टी.महामंडळ व मान्यताप्रप्त संघटनांशी चर्चा करुन रात्रवस्ती भत्त्यात लवकरच वाढ करणार असल्याचे सांगितले.तसेच शेवटच्या बसस्थानकावरील मुक्कामाच्या ठिकाणी चालक व वाहकांच्या असुविधेबाबत बोलताना मुक्कामाच्या ठिकाणची विश्रामगृहे व शौचालये अद्यावत करण्याच्या सुचना तत्काळ दिल्या जातील असे सांगितले.यावेळी प्रश्नावर झालेल्या चर्चेत बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एस.टी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी राज्यातील बसस्थानके बीओटी तत्त्वावर चालवण्यास देण्यासंदर्भात सरकार काय निर्णय घेणार आहे याबाबत विचारणा केली असता राज्यातील काही बसस्थानके बिओटी तत्वावर चालवण्याबाबतचे प्रस्ताव तयार होत असून त्यावर लवकरच निर्णय घेवुन अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत गटनेते प्रविण दरेकर,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आ.शशिकांत शिंदे,आ.सुनिल शिंदे,मनिषा कायंदे,आ.उमा खापरे,यांनी सहभाग घेतला.







