जनता दरबार च्या माध्यमातून शेकडो रुग्णांवर मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देणारे आरोग्यदूत आमदार राम सातपुते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अकलूज (गणेश जाधव )स्वतः ऊसतोड मजुराचा मुलगा असल्यामुळे अतिशय गरीब कुटूंबात जन्माला आल्यामुळे गरिबांचे दुःख काय असते याची लहानपणापासून माहिती असल्यामुळे आ. सातपुते हे आपल्या जनता दरबार च्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न हाताळून ते सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत आहेत. कोणताही नागरिक कोणत्याही प्रकारची समस्या घेऊन जनता दरबारात आल्यानंतर ते काम हमखास होणारच असा विश्वास नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे जनता दरबारात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.त्याचप्रमाणे जनता दरबार च्या माध्यमातून रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा समजून कार्यरत असणारे माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळे आजार असलेल्या शेकडो रुग्णांवर नामवंत रुग्णालयात मोफत उपचार मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे त्यांचे नेतृत्व सध्या तालुक्यासाठी वरदान ठरताना दिसत असून, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे सगळीकडे स्वागत होताना दिसत आहे. अनेक रुग्णांना त्यांच्यामुळे जीवनदान मिळताना दिसत असून माणुसकीचा धर्म ते तंतोतंत पाळताना दिसत आहेत.माळशिरस तालुक्यातील अनेक रुग्णांवर पुणे येथे मोफत उपचार करून असंख्य रुग्णांचा आधारवड बनलेले आमदार राम सातपुते यांचे नेतृत्व खरोखरच तालुक्यासाठी वरदान ठरताना दिसत आहे.समाजऋण मान्य करून त्यातून उत्तराई होण्याच्या भूमिकेतून जो काम करतो तोच खरा सर्वार्थ आदरार्थी ठरतो. माणसात देव शोधून जो माणसांची सेवा करतो दुःखी माणसांच्या मदतीला धावून जातो. तोच खरा आदर्श माणूस असतो. आणि अशीच भूमिका सध्या राम सातपुते पार पडताना दिसत आहेत.परिस स्पर्शाने लोखंडाचे देखील सोने होते असे म्हटले जाते पण याचा अनुभव प्रत्यक्षात माळशिरस तालुक्यातील जनता अनुभवताना दिसते आहे.अनेकांचे अश्रू पुसत त्यांना आधार देत आमदार सातपुते यांनी केलेले लोकांसाठी आरोग्य दूताचे कार्य खरोखरच अनेकांसाठी जीवनदायी ठरताना दिसते आहे.ज्यांच्या घरचा माणूस आजारी पडतो किंवा दुर्धर आजाराने त्रस्त असतो तेव्हा त्यांनाच त्या परिस्थितीची जाणीव कळते आर्थिक टंचाई आणि खचलेले मनोबल यामुळे त्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळत असतो.जवळचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार देखील अशावेळी अंग काढून घेण्याच्या भूमिकेत असतात पण अशा काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा देवदुत असतो. आणि हीच भूमिका आमदार राम सातपुते यांनी वटवली आहे.दुःखी नागरिकांच्या मदतीला धावून जाणे त्यांचे दुःखाचे निवारण करणे ही त्यांच्या कामाची खासियत राहिली आहे. म्हणूनच ते आजकाल तालुक्याच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.अनेकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न सोडविणारे आमदार सातपुते खरोखरच तालुक्यासाठी आरोग्य दूत म्हणून अनेकांचे प्राण वाचवताना दिसत आहेत.जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न सोडवित असताना विकास कामांना गवसणी घालत असताना आपल्या मतदार संघातील गरीब रुग्णांची सेवा करताना माणुसकीचा खऱ्या अर्थाने धर्म ते जपताना दिसत आहेत.माणसाच्या जीवनात काही नाही असे आपण सहज म्हणतो कधीही मृत्यू येऊ शकतो.आणि जगाचा निरोप घ्यावा लागतो.पण या नकारात्मक विचारात न राहता आमदार सातपुते यांनी प्रत्येकाच्या मनात जगण्याची उमीद निर्माण केली आहे. अनेक दुःखीतांचे दुःख पुसून त्यांच्यात जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण केली आहे.अनेक लोकांची सेवा करत असताना आमदार राम सातपुते हे नाव आता माळशिरस तालुक्याच्या काळजावर कोरले जाऊ लागले आहे हे मात्र नक्की.
12मार्च आमदार रामभाऊ सातपुते यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा














