शिवरत्न रंगोत्सव उत्साहात साजरा
प्रतिनिधी/अकलूज;
धैर्यशिल मोहिते-पाटील अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या कल्पनेतून रंगपंचमीनिमित्त शिवरत्न शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या करीता रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स काॅलेज,विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग काॅलेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी यांनी हिंदी-मराठी गीतांवर थिरकत नैसर्गिक रंगांची उधळण करीत रंगोत्सव धडाक्यात व उत्साहात साजरा केला. सप्तरंगांत न्हाऊन निघालेल्या तरुणाईचा जल्लोष अनुभवायला मिळाला.मी मुंबईत शिक्षण घेतले,आम्ही महाविद्यालयीन काळात शिक्षणा सोबत इतरही शहरातील कल्चरल जीवनाचा आनंद घेतला तो अनुभव शहरातील महाविद्यालयीन कल्चरल जीवनाचा अनुभव आपल्या इथल्या विद्यार्थांना मिळावा म्हणून शिवरत्न रंगोत्सव आयोजन केले होते असे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले.या रंगोत्सवात विद्यार्थ्यांच्या सोबत संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील,राजकुंवर मोहिते-पाटील, राजइंदीरा मोहिते-पाटील,संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक,कर्मचारी सहभागी झाले होते.












