*अँड. रणजीत भोसले यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सोलापूर जिल्हा-उपाध्यक्ष पदी निवड*

अकलूज (प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र राज्याचे भाजपा चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते ॲड.रणजीत शंकरराव भोसले यांची भारतीय जनता युवा मोर्चा च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. निवडी चे पत्र युवा मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश घोडके यांनी पाठवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी रणजीत भोसले यांनी धैर्यशिल मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ध्येय, धोरणे,केंद्राच्या विविध योजना तळागाळा पर्यंत पोहचवून जिल्हा व तालुका भाजपामय करणार असून,जिल्ह्यातील तरुणांना एकत्र करून भारतीय जनता युवा मोर्चाचे माध्यमातून तरुणांची एक फळी निर्माण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले… यावेळी लालासाहेब अडगळे.किशोर घोलप.महेश सुर्यवंशी.धनाजी भोसले.संदिप वडतिले.शंकर चुनाडे.महावीर भोसले.व इतर मान्यवर उपस्थित होते.








