*10 वी बोर्ड परीक्षेची अकलाई विद्यालय येथे सुरुवात* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2023 या परीक्षेला आज अकलाई विद्यालय, अकलूज(केंद्र क्र.३११६ ) या केंद्रावर सुरुवात झाली. केंद्रावर सर्व विद्यार्थी व पालक हे उत्साह पूर्ण वातावरणात हजर होते. सदर केंद्रावर कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती श्री. जयसिंह मोहिते पाटील विद्यालय, संग्रामनगर व अकलाई विद्यालय, अकलूज या विद्यालयातील एकूण १६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.यावेळी सकाळी ठीक १० वाजता सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना बोलावून त्यांना केंद्रप्रमुख श्री. प्रताप तोरणे सर यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी दिलेल्या सूचना पुन्हा सांगितल्या त्यांना कॉपीमुक्त व ताणतणाव मुक्त वातावरणात पेपर लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना परीक्षेपूर्वी गुलाब पुष्प देऊन त्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रप्रमुख श्री. प्रताप तोरणे सर श्री. जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर चे मुख्याध्यापक श्री. बी. टी. शिंदे सर व अकलाई विद्यालय, अकलूज चे मुख्याध्यापक श्री. वि. बी. जाधव सर हे उपस्थित होते. तसेच केंद्राचे बिल्डिंग कंडक्टर श्री. मदन माने देशमुख व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना तपासून त्यांना कोणताही गैरमार्ग न करण्याचा सल्ला दिला व बरोबर अकरा वाजता परीक्षेस सुरुवात झाली.








