*गणपती फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी बेंबळे गावामध्ये केले श्रमदान*
अकोले खुर्द ता.माढा येथील गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दोन दिवसीय कॅम्प संपन्न केलेला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ.रूपाली बेंदगुडे यांनी दिली. गणपती फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे स्वच्छता, वृक्षारोपण व हेल्थ चेकअप कॅम्प युवाशक्ती या संकल्पनेवर दोन दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन बेंबळे गावचे सरपंच श्री. विजय पवार, संस्थेचे सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे , माजी सरपंच कैलास भोसले, पोलीस पाटील बिभीषण किर्त्ते,यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार श्री.मुकुंद रामदसे, श्री. महादेव घाडगे, श्री वाय जी भोसले, श्री. ननवरे सर आणि सर्व ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर व त्याचे महत्त्व पथनाट्याच्या माध्यमातून सादर केले.यावेळी श्री विजय पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा आहे. स्वयंसेवकांनी स्वतःच्या विकासाबरोबरच समाज व राष्ट्रविकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे. शिबिराचे आभार प्रदर्शन डॉ. आर.डी.बेंदगुडे यांनी केले. शिबिराचे समन्वयक म्हणून प्रा. सुकुमार लांडे यांनी कार्य केले. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा.शिवराज ढगे प्रा. अक्षय भेंकी, ,प्रा.रेणुका शिंदे,प्रा.मोनिका माळी यांनी परिश्रम घेतले.







