शास्त्र ज्ञ सि. व्ही. रामन यांच्या शोधाचा कृषी आणि आरोग्य क्षेत्रातही उपयोग : प्रा. संजय जाधव
कोडोली, ता. 28 : “
जिद्द, चिकाटी च्या जोरावर आपल्या प्रश्नाची उत्तरे शोधताना डॉ. सी. व्ही. रामन यांनी ‘ रामन इफेक्ट’ चा शोध लावला. त्यांच्या शोधाचा उपयोग कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रात होत आहे,” अशी माहिती प्रा. संजय जाधव यांनी दिली. कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शास्त्र ज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय वि ज्ञान दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. डॉ. विश्वनाथ पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ” शिक्षकांनी स्वतः अंधश्रद्धाळू असता कामा नये. त्यांनी अंधश्रद्धे पासून दूर राहून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वै ज्ञा नि क दृष्टिकोन बिंबव ला पाहिजे.” याप्रसंगी सीमा चोपडे, अश्विनी काळे या विद्यार्थिनी – शिक्षकांची डॉ. सी. व्ही. रामन यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारी भाषणे झाली. माधुरी पाटील यांनी सूत्रसंचलन केले. शीतल चौ ग ले यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. डी. डी. पाटील, प्रा. श्रीमती गु ल ना स मुजावर, कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, वरीष्ठ लिपिक अनिल इंदुलकर, तानाजी मोहिते यांच्यासह प्र थ म व द्वितीय वर्षातील विद्यार्थी – शिक्षक उपस्थित होते.







