*राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाकडून अकलूजच्या नवीन बसस्थानकाची स्वच्छता*
संग्रामनगर दि.२४ (संजय लोहकरे यांजकडून)अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून अकलूजमधील नवीन बस स्थानकाची स्वयंस्फूर्तीने स्वच्छता केली.गाडगेबाबांनी यांनी स्वच्छतेविषयी समाजात जनजागृती करून सुद्धा आज ही लोक सार्वजनिक ठिकाणी बेफिकीरपणे प्लास्टिकच्या पिशव्या,पाण्याच्या बाटल्या व इतर घनकचरा टाकून परिसर अस्वच्छ करत आहेत.त्यातून लोकांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होत आहेत.त्यामुळे अकलूज बस स्थानकामध्ये अस्ताव्यस्त पडलेला कचरा पाहून शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने बस स्थानकाची स्वच्छता मोहिम हाती घेऊन बस स्थानकाचा परिसर स्वच्छ केला.तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना जाहिरातीचे बॅनर-पोस्टर लावताना लोकांनी मारलेल्या खिळ्यांमुळे झाडांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे दिसून आल्याने स्वयंसेवकांनी झाडाचे खिळे काढून झाडे जगविण्याचा प्रयत्न केला.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे आजी-माजी स्वयंसेवक सहभागी झाले होते. हे काम करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक सत्यजित चव्हाण,नागनाथ साळवे,प्रशांत वाघमारे,विनायक मंडले,प्रसाद शिंदे,अविनाश देशमुख,प्रतीक फुले,निलेश खंडागळे,जुनेद मुलाणी,आदित्य पोतदार.इत्यादीनी सहभाग घेतला.हा उपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दत्तात्रय मगर,डॉ.सविता सातपुते,प्रा.सज्जन पवार,डॉ.चंकेश्वर लोंढे,डॉ.चंद्रशेखर ताटे-देशमुख यांनी मार्गदर्शन लाभले.












