*नऊ हजार वह्या व तीन हजार रोपे भेट देऊन शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
अकलूज : माळशिरस तालुक्यासह जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून नऊ हजार वही व तीन हजार रोपे भेट देत अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हार फुले या खर्चाला फाटा देत असंख्य कार्यकर्त्यांनी शालेय साहित्य आणून तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवबाबांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळ पासूनच त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी वर्दळ पाहायला मिळाली. सकाळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या समाधीचे व श्रीक्षेत्र आनंदी गणेश येथील कै.उदयसिंह मोहिते पाटील यांच्या शक्तीस्थलाचे दर्शन घेऊन आईसाहेब डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी पत्नी सौ.देवन्या यांनी त्यांचे औक्षण केले.वाढदिवसानिमित्त माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्यासह माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय अधिकारी यांनी शिवतेजसिंह यांना प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून तसेच सोशल मिडिया च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.अनावश्यक खर्चाला फाटा देऊन हार फुले न आणता शालेय साहित्य आणावे असे आवाहन शिवकीर्ती युवा मंच च्या माध्यमातून केल्यानंतर या आवाहनाला उदंड प्रतिसाद लाभला अनेक जणांनी वह्या, पेन, रोपे अशा वस्तू आणत आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला.
चौकट :
*क्रेन ने आणलेला हार ठरला आकर्षण*महाळुंग येथील नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, तानाजी भगत, विपीन सूर्यवंशी, बबलू भगत व श्रीपुर येथील सागर यादव, बजरंग भोसले यांनी आणलेल्या सुमारे दोन हजार किलो वजनाचा पुष्पहार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. हालगीच्या तालावर व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.







