खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करावा- जयकुमार शिंदे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वाढदिवसा दिनी पक्ष कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी..

अकलूज (प्रतिनिधी )माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा 19 फेब्रुवारी 2023रोजी वाढदिवस आहे. प्रत्येक वर्षी माढा मतदार संघातील कार्यकर्ते व पदाधिकारी व तालुक्यातील जनता मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करत असतात.परंतु,यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा असल्याकारणाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्याबरोबर कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी व जनतेने शुभेच्छा देण्यासाठी फलटण ला येऊ नये.तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात येत आहे की,खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून आपण साजरा करावा. त्यामध्ये फळ वाटप , रक्तदान शिबिर, गावाची ,मंदिराची स्वच्छता असेल अशा विविध कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा करावा.असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केले आहे.







