सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे :
शैलेश भाऊ पवार मित्र परिवार आणि सौरभ उद्योग समूह च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव ज्योती ताई आदाटे यांना *कर्तृत्ववान महिला पुरस्कार* देण्यात आला हा पुरस्कार सौ मनिषा शैलेश पवार यांचे हस्ते देण्यात आला यावेळी सौ मंजिरी सुधीर गाडगीळ,सौ सुमन सुरेश खाडे,सौ स्वाती व्हनखडे,विद्या प्रशांत खिलारे , प्रियांका तुपलोंडे आणि सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री सौ प्राची गोडबोले यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन ज्योती ताईंना सन्मानित करण्यात आले.यावेळी या उद्योग समुहाचे अध्यक्ष शैलेश भाऊ पवार म्हणाले माझ्या या 18 नं प्रभागात अनेक कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा सन्मान करणे माझे कर्तव्य आहे.यामध्ये आमच्या वर्गमैत्रिण ज्योती ताई यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .त्यांचे सामाजिक कार्य आम्ही काॅलेज जीवनापासूनच बघत आलो आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासांठी लढणार्या ज्योती ताई बी ए च्या पहिल्या वर्षात असतानाच निवडुन आल्या आणि पुढे सलग तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागात निवडुन येऊन त्यांनी हॅट्रीक केली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अनेक उपेक्षित निराधार असाह्य महिलांना तसेच वृद्धनिराधार दिव्यांग अशा एक ना अनेक वंचित घटकांपर्यंत योजना पोहोचवुन त्यांचा आधार बनल्या. महिलांचे सामाजिक आर्थिक स्थैर्य उंचावण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करीत असतात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रबोधन मंच च्या कार्याध्यक्षा म्हणून त्या सक्रिय आहेत त्यांनी त्यांच्या टीमसोबत जिवाची पर्वा न करता अनेक भोंदुबाबांचा पर्दाफाश केला आहे तसेच अनेक शाळा काॅलेजमधुन चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिकेसहित व्याख्याने देत असतात.त्या नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुध्दा आहेत अनेक नाटकांमधून आणि चित्रपटात दिग्गज कलाकारांसोबत काम करून या सांस्कृतिक क्षेत्रात ही आपला ठसा उमटवला आहे.अशा या आमच्या वर्गमैत्रिन ज्योती ताई यांना पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे.यावेळी ज्योतीताईंच्या हस्ते काही महिलांचा सन्मान करण्यात आला.या प्रभागातील नामांकित डाॅक्टर शबनम शेख,कार्यक्षम शिक्षिका विद्या गायकवाड, मुलांना उत्तम घडविणार्या शारदा तुपलोंडे,धडाडीची कार्यकर्ती राणी कदम,आणि महिला ड्रायव्हर अनिता चौगुले यांना ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.







