*शिवरत्न पॅटर्नच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जिंकण्याची सवय लावली ; शितलदेवी मोहिते-पाटील**शिवरत्न पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याचे काम*

प्रतिनिधी/अकलूज; दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे यासाठी शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील व अध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार शिवरत्न पॅटर्नच्या वतीने दहावी व बारावी नंतर करीअरच्या संधी या विषयावर विद्यार्थी व पालक यांचेसाठी शिक्षणतज्ञ सारिका मोहन पाटील यांचे वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा या विषयावर मार्गदर्शन सेमिनार व शिवरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२२ बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.Neet/JEE/MHCET परीक्षांना सामोरे जाताना येणाऱ्या अडचणींबाबत सखोल मार्गदर्शन. दहावी व बारावी नंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा? कोणतं करिअर निवडायचं? असे प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतो. तुमच्याकडे असलेल्या क्षमता, मिळणारे ज्ञान, या क्षेत्रातील आव्हानं तसचं तुमच्या अभ्यासाचा उपयोग हे पाहून करिअर निवडावे. त्यासाठी शिक्षणतज्ज्ञ सारिका पाटील यांचे मार्गदर्शनाची लाभले.शिवरत्न पॅटर्नच्या वतीने इ.१० वी मधील विद्यार्थ्यांसाठी शिवरत्न टॅलेंट सर्च परीक्षा’ आयोजित करण्यात आली होती या वेळेस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.चि.शिवराज सुरवसे, पुरंदावडे-प्रथम क्रमांक चि.हर्ष गांधी,अकलूज – द्वितीय क्रमांकचि.अदर्श घाळे, नातेपुते – तृतीय क्रमांक कु.साक्षी गोरे ,नातेपुते, -तृतीय क्रमांक कु.प्राची रणनवरे , फळवणी – उत्तेजनार्थ चि.राज फडे, अकलूज- उत्तेजनार्थकु.श्रुती नरवणे, संग्रामनगर – उत्तेजनार्थकु.सृष्टी भोसले ,फळवणी- उत्तेजनार्थकु.अनुष्का केदारी – सवतगव्हाण – उत्तेजनार्थचि.आर्यन मगर ,यशवंतनगर – विशेष प्राविण्य चि.साहील देवडे, अकलूज – विशेष प्राविण्य सदर कार्यक्रमासाठी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शितलदेवी मोहिते पाटील, सचिव धर्मराज दगडे, संचालक डॉक्टर विश्वनाथ आवड ,श्रीकांत राऊत, दत्तात्रय लिके,प्रशांत जगताप,अनिल जाधव ,तानाजी काशिद,नितीन बनकर प्राचार्य अरविंद कुंभार,उपप्राचार्य डाॅ.महेश ढेंबरे, अश्रफ शेख व समन्वयक राजकिरण माने व इतर मान्यवर उपस्थित होते.या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास १०,०००/- रुपये, द्वितीय क्रमांकास ७०००/- रुपये, तृतीय क्रमांकास ५०००/- रुपये तर उत्तेजनार्थ पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०००/- रुपये व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रोहित देशमुख यांनी केले तर प्रस्तावना समन्वयक राजकिरण माने देशमुख यांनी केले.







