बी. एड. च्या विद्यार्थी – शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा – प्राचार्य डॉ. बाळासाहेब ला ड व क र यांचे प्रतिपादन
कोडोली / तारीख 30 : ” सन 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणाची सध्या अमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार या शैक्षणिक धोरणाचा सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी बारकाईने अभ्यास करावा. बी. एड. च्या विद्यार्थी – शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणातील कौशल्ये आत्मसात करावीत,” असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे संचालक व विद्यापीठाचे सल्लागार प्राचार्य, डॉ. बाळासाहेब ला ड गा व क र यांनी केले. कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात डॉ. ला ड गा व क र यांचा संचालक पदाच्या नियुक्तीबद्दल ‘ भूमिपुत्र’ या नात्याने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सत्कारमूर्ती डॉ. ला ड गा व क र यांच्या हस्ते महात्मा गांधी व सरस्वती देवीच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. ” नवीन शैक्षणिक धोरणातील उच्च शिक्षणा त अनेक नवे बदल अंतर्भूत झाले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे,” अशी अपेक्षा व्यक्त करताना प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील पुढे म्हणाले, ” उच्च शिक्षणात शरीर आणि मन बळकट करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी शारीरिक शिक्षण आणि नैतिक शिक्षण यांचे बळकटीकरण केले पाहिजे. ” प्रास्ताविक प्रा. डी. डी. पाटील यांनी केले. विद्यार्थिनी – शिक्षिका पद्मश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संजय जाधव यांनी आभार मानले.







