*शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल व ग्रीनफिंगर्स स्कूल मध्ये परीक्षा पे चर्चा संपन्न*
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्षरीत्या व देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व मा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनपर शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल व ग्रीनफिंगर्स स्कूल अकलूज येथे विद्यार्थ्यांकरीता पंतप्रधान मोदीजी यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.यश-अपयशाची भीती न बाळगता परीक्षेला सामोरं जा, असा कानमंत्र पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहेतसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत म्हणाले- आईकडून वेळेचे व्यवस्थापन शिका.. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी थेट संवाद साधत परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदीजी यांनी शिक्षण आणि करिअरशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यानुसार, 38 लाख विद्यार्थ्यी सहभागी झाले. त्यापैकी 16 लाखांहून अधिक राज्य मंडळांचे आहेत. गेल्या वर्षीच्या नोंदणीपेक्षा हे प्रमाण 15 लाखांनी अधिक आहे. अकलूज येथील परीक्षा पे चर्चा आयोजित ऑनलाईन कार्यक्रमास आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,आ.राम सातपुते, मा.धैर्यशिल मोहिते-पाटील, SMP व ग्रीनफिंगर्स स्कूलचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, उपस्थित होते.












